श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
☆ रंजना जी यांचे साहित्य # 68 – तू तिथे मी ☆
जेव्हा तू तिथे मी अशी
आस जीवाला मिळते।
एकटेपणाची भावना
वार्यासवे ती पळते ।।
वाळवंटी चालतानाही
शितलता ही जाणवते
काटेकुटे सारे काही
पुष्पा समान भासते ।।
भयान आंधःकारी ही
ज्योत मनी जागते ।
चिंता भीती सारे काही
क्षणार्धात नष्ट होते।।
आस तुझी पावलांना
नवीन शक्ती स्फूर्ती देते।
जगण्याची उर्मी पुन्हा
मम गात्रामध्ये येते।।
पाठीवरचा हात तुझा
निर्धाराला बळ देईल।
अंधःकारी वाट माझी
आईने उजळून जाईल।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈