सुश्री प्रभा सोनवणे
☆ गझल ☆
मिळती मला तुझीही ती पोफळी कदाचित
बसती घडी इथेही मग वेगळी कदाचित
काजू रसाळ असती, बागा फळाफुलाच्या
माझ्याच मालकीच्या त्या नारळी कदाचित
गोव्यात राहते तर होती धमाल मोठी
दिसली मलाच असती ती मासळी कदाचित
जन्मास घातले तू त्या कोकणात देवा
आजोळच्या घराची सय कोवळी कदाचित
घाटावरीच होते प्रारब्ध नांदण्याचे
बोरी ब-याच होत्या सल बाभळी कदाचित
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈