श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 110 ☆
☆ ‘तू’ ☆
हासते आहेस तू
लाजते आहेस तू
मख्ख माझा चेहरा
वाचते आहेस तू
तळ मनाचा खोल पण
गाठते आहेस तू
लाज पदराखालती
झाकते आहेस तू
सूर्य नाही काजवा
मागते आहेस तू
सृजनतेची वेदना
जाणते आहेस तू
जीवनाचा अर्थही
सांगते आहेस तू
एक भक्तीचा दिवा
लावते आहेस तू
सोबतीने आजही
चालते आहेस तू
देह आणिक भाकरी
भाजते आहेस तू
नाहताना चांदणे
सांडते आहेस तू
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈