श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 81 – वीण ☆
संसाराची वीण अचानक, उसवत गेली।
आयुष्याची घडी अनोखी, चकवत गेली।
गोड गुलाबी स्वप्न मनोहर, तुझेच सखये।
अर्ध्यावरती डाव असा का, उधळत गेली।
घरट्यामधली पिले गोड ही, किलबिलणारी।
पंखामधली ऊब तयांच्या, हरवत गेली।
काळासंगे झुंज देत ही, घुटमळणारी।
ओढ लावूनी छबी तुझी ग, रडवत गेली।
देऊ कसा ग निरोप तुजला, आज साजणी।
मनी वेदना पुन्हा पुन्हा ती, उसळत गेली।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈