मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #8 – त्याचा गुरू ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है ।  साप्ताहिक स्तम्भ  अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण  कविता  “ त्याचा गुरू”।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #  8 ☆

? त्याचा गुरू ?

 

वाट सारुनीया मागे चालला हा वाटसरू

सोबतीला नाही कुणी त्याचे पाय त्याचे गुरू

 

हिरवळीचा मी पांथ कधी काट्यामध्ये फिरू

वेल कोवळ्या फुलांची तिला सावरून धरू

 

सुख पुढे नेण्यामध्ये कधी यशस्वी ही ठरू

अपयशाचे गारूड त्याला मातीमध्ये पुरू

 

जेव्हा  सूर्य माथ्यावर तेव्हा  छाया देती तरू

पंख वाटतात फांद्या त्याच्या कुशीमध्ये शिरू

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]