सुश्री प्रभा सोनवणे
साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 118
☆ मनस्विनी ☆
(कन्यादिन-२४ जानेवारी)
मला हवी होती
एक मुलगी,
माझ्या सारख्याच
चेह-या मोह-याची,
माझी झालेली प्रत्येक
कुचंबणा टाळू शकणारी,
माझ्या बुजरेपणाचा,
भित्रेपणाचा लवलेशही
नसणारी,
एक तेजस्विनी हवी होती मला,
माझी अनेक अधुरी स्वप्नं,
सत्यात उतरवणारी
सत्यवती,
मी हरलेले क्षण जिंकून घेणारी
अपराजिता
हवी होती मला !
माझ्या पोटी जन्मायला
हवी होती,
मी मनात जपलेली
मनस्विनी !
(अनिकेत-१९९७ मधून—१९९४ साली लिहिलंय…)
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈