मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 8 – कॅनव्हास…! ☆ – श्री सुजित कदम
श्री सुजित कदम
(श्री सुजित कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं। यह सच है कि अक्सर हमारे जीवन के रंग हृदय के कॅनव्हास से नहीं उतर पाते और प्रकृति के रंग उस पर चढ़ नहीं पाते। आज प्रस्तुत है उनकी एक संस्मरणात्मक भावुक कविता “कॅनव्हास…!”। )
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #8 ☆
☆ कॅनव्हास…! ☆
गेल्या कित्येक वर्षात
माझ्या कॅनव्हास वर
पावसाचं चित्रंच उमटलं नाही…
का कोणास ठाऊक
आता पहील्या सारखा पाऊस
रंगामध्ये दाटूनच येत नाही
कितीतरी वेळ मी
कॅनव्हास समोर ठेवून
त्याच्याकडे एक टक पहात रहातो
आता तर
कॅनव्हास वर श्वास घेणारे रंग ही
पाऊस म्हटलं तरी
ब्रश वर गोठायला लागलेत कारण…
माझ्या बापाला
माझी माय गेल्यावर रडताना पाहीलं
आणि तेव्हाच काय तो हवा तेवढा
पाऊस नजरेत साठवला
त्या वेळी त्या पावसाचं चित्र
काळजाच्या इतक्या खोलवर जाऊन
उमटलं की तेव्हापासून
हा बाहेर कोसळणारा पाऊस
कॅनव्हास वर कधी उतरवावासाच वाटला नाही
आणि काळजातल्या त्या पावसा समोर
रंगाचा हा पाऊस कॅनव्हॅसवर
कधी बोलकाच झालाच नाही….!
© सुजित कदम