श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ निर्माल्याची ओटी ☆
तुझ्या प्रेमाखातर मी
हात ढगाचा सोडला
खाली येऊन पाहिले
माझा कणाच मोडला
खाचखळगे मिळाले
चाललोय धक्के खात
बांधावर मी थांबतो
मला आवडते शेत
वाहणाऱ्या ह्या नदीला
नको निर्माल्याची ओटी
काहीजण घासतात
तिथे भांडी खरकटी
सागराच्या भेटीसाठी
होउनीया आलो झरा
आत्मा माझा हा निर्मळ
आणि सोबती कचरा…
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈