श्री सुजित कदम
साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य # 101
☆ निशब्द…! ☆
चार भिंतीच्या आत
एक कोपरा तुझा
एक कोपरा माझा…!
माझ्या कोप-यात किबोर्ड वर
बागडणारी माझी बोटं
आणि
तुझ्या कोप-यात
भांड्यावर सफाईदारपणे फिरणारे
तुझे हात
घरातल्या प्रत्येक कोप-यात
तुझ्या माझ्या अस्तित्वाच्या अशा काही
संकेतवजा वस्तू
सोडल्या तर
तुझ माझ अस्तित्व असं
काही उरणारच नाही
कारण
तुझ्या माझ्यात काही
संवाद झालाच
तर तो ह्या कोप-यातल्या
कोणत्या ना कोणत्या
वस्तूंच्या साक्षीनेच होतो…
नाहीतर
इतरवेळी आपण फक्त
निशब्द असतो
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈