श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। अब आप उनकी अतिसुन्दर रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है उनके द्वारा  विज्ञान पर आधारित सांस्कृतिक आलेख   निसर्ग चक्र आहार आणि आपली संस्कृती ।)

 

? साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य #-8  ? 

 

?  निसर्ग चक्र आहार आणि आपली संस्कृती ?

 

उन्हाळ्यात जठराग्नी उत्तम कार्य करतो त्यामुळे जास्त उपवास नसतात परंतु आषाढी नंतर  मात्र पावसाळा म्हटलं की भूक मंदावते पोटाचे विकार टाळण्यासाठी काहीजण चातुर्मास तर काही लोक श्रावण महिना उपवास करतात .या काळात एक वेळेस जेवण घेतले जाते  ज्यांना शक्य नसेल ते दूध फल आहार किंवा पचायला हलके पदार्थ सेवन करतात .या महिन्यात बहुतेक सणाला नैवेद्य म्हणून उकडीचे पदार्थ जसे कडबू ,फळं, दिवे, मोदक, कढी ,खिचडी, दुधातली दशमी, मुगाची डाळ घालून भाजी असे जे पचायला सहज सुलभ असतात . *या काळात मौसाहार वर्ज्य  मानला जातो*  कारण मुळात माणूस हा शाकाहारी प्राणी आहे . मुळात हे समजून घेणे गरजेचे आहे की हे कुणी धर्म पंडीतांनी सांगितलेले नसून नैसर्गिक आहे गाईला, घोड्याला, शेळी, बकरी यांना कोणत्याही पंडीताने गवत खायला सांगितले नाही तर ते निसर्ग नियम पाळतात . जे प्राणी ओठ लावून पाणी पितात ते सर्व शाकाहारी व जे जिभेने पाणी पितात ते मौसाहारी त्यांच्या दातांंची रचना वेगळी असते माणसाला वाघ कुत्रा यांच्यासारखे सुळे नसतात . शिवाय निदान पावसाळ्यात आपण ज्यांना खातो त्यांना होणारे आजार माशा जंतू संसर्ग इत्यादी बाबींचा विचार करून वैज्ञानिक दृष्टीने ठरवलेला हा  नियम आहे. त्यामुळे विरोधासाठी विरोध हे तत्त्व सोडून कुठलीही टोकाची भूमिका नसावी, कालसापेक्ष यात  काही बदल नक्कीच ग्राह्य असतात.  महालक्ष्मी नवरात्री पासून हळूहळू तळीव पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढवणारे सण येतात जसे महालक्ष्मी, दसरा, दिवाळी, नागदिवे मकर संक्रांत कारण शरीराला स्निग्धते सोबत उष्मांक मिळणे सुद्धा गरजेचे असते. म्हणून जवळजवळ सर्वच सणांना भरपूर तळलेले गोड पदार्थ (फक्त एक सुचवावेसे वाटते पूर्वी हे सर्व पदार्थ गूळ वापरून केले जात असत तसे ) असावेत .

पुढे उन्हाळ्याची चाहूल लागली की, पन्हे मठ्ठा ताक लस्सी सरबत आंब्याचा रस कुरवडी पापड लोणची या पदार्थांची रेलचेल सुरू होते . एकूणच काय तर आपली संस्कृती म्हणजे जे देहाला ते देवाला अशी आहे . स्थल काल परत्वे यात  भेद नक्कीच आहेत जसे देशावरच्या देवाला बिन मिठाचा भात तर कोकणातील देवाला भात मासे , तरीसुद्धा नारळी पौर्णिमेला नारळी भातच असतो भात मासळी नाही हे विसरू नये.

बिन मिठाचा भातच का? सुरुवातीला साधं वरण भातच का? खावा शेवटी दहीभातच का? खावा या सर्वांनाच धार्मिक सोबतच वैज्ञानिक सुद्धा कारणे आहेत ती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा .केवळ धर्माला विरोध म्हणून सगळ्याला विरोध ही बाब नक्कीच मानवासाठी घातक ठरेल .जगातला कुठलाही धर्म वाईट कर्माचे समर्थन करत नाही तर आपण स्वार्थासाठी त्याचे हवे तसे अर्थ लावत असतो. हे सर्वांसाठीच घातक आहे याचा विचार होणे गरजेचे आहे अर्थातच हे सर्व माझे मत आहे परंतु  विज्ञानाची जोड नक्कीच आहे.

 

©  रंजना मधुकर लसणे✍

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments