श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । साप्ताहिक स्तम्भ अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण एवं सार्थक कविता “सेल्फी संन्याशी ”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 9 ☆
खरं सांगतो, मला सेल्फी काढायला
बिल्कूल आवडात नाही
कारण… तो टिपतो
माझ्या चेहर्यावर आणलेले
ते खोटे खोटे भाव
आणि मुखवट्यावर थापलेला
मेकअपचा थर
माझ्या आत वाहणारे रक्ताचे झरे
रक्तमांसाची हृदयात होणारी धडधड
त्याला कधी टिपताच आली नाही
कितीही क्लोजअप घेतला तरी
भावनांचे हिंदोळे, प्रतिभांचे कंगोरे
काही काहीच दिसत नाही त्याला
मग अशा सेल्फीचा काय फायदा
नद्या, दर्या, सागरात,
कड्यावर उभंं राहून
आपल्या धाडसाचंं
सेल्फिसाठी प्रदर्शन मांडणार्या तरुणांचाही
मला खूप राग येतो
चुकून पाय घसरून खाली पडल्यास
स्वतःच्या देहाचा
आणि आई-बापाच्या स्वप्नांचा
क्षणात चुराडा होईल
याची जाण सेल्फी काढना
तरुणांना असायला हवी
नाही तर त्यांनीही माझ्या सारखं
’सेल्फी संन्याशी’ व्हायला हरकत नाही
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
अरे वा …छान