मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ कवितेच्या प्रदेशात # 10 – वृक्षातळी ☆ – सुश्री प्रभा सोनवणे
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में उनकी कविता वृक्षातळी। यह शाश्वत सत्य है कि जो समय बीत चुका है उसकी पुनरावृत्ति असंभव है। उस बीते हुए समय के साथ बहुत सी स्मृतियाँ और बहुत से अपने वरिष्ठ भी पीछे छूट जाते हैं और अपनी स्मृतियाँ छोड़ जाते हैं । फिर यह अनंत प्रक्रिया समय के साथ चलती रहती है। आज हमारी स्मृतियों में कोई अंकित है तो कल हम किसी की स्मृतियों में अंकित होंगे। पीढ़ी दर पीढ़ी चल रही इस प्रक्रिया को सुश्री प्रभा जी ने अत्यंत सहजता से काव्य स्वरूप दिया है।
आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 10 ☆
☆ वृक्षातळी ☆
माणसं आपल्या अवतीभवती असतात तेव्हा ब-याचदा दुर्लक्षिली जातात…..पण ती या जगातून निघून गेल्यावर त्यांची किंमत कळते, उणीव भासते, असं का होतं?आपण या विचाराने अस्वस्थ होतो, दुःखी होतो… ही जगरहाटी आहे…
“जिन्दगी के सफरमे गुजर जाते है जो मकाम, वो फिर नही आते…..”
आत्ता आईची आठवण येते पण आई खुप दूर निघून गेली…..
एक अतिविशाल वृक्ष ,
अचानक भेटला प्रवासात आणि आठवले,
इथे येऊन गेलोय आपण,
पूर्वी कधीतरी …..
जाग्या झाल्या सा-याच आठवणी !
पाय पसरून बसलेल्या
या ऐसपैस वृक्षाच्या बुंध्याशी बसून काढली होती
स्वतःचीच अनेक छायाचित्रे !
तेव्हा नव्हते जाणवले पण आज
आठवते आहे आज,
आई घरी एकटीच होती
आणि आपण भटकलो होतो
रानोमाळ जंगलातले नाचरे मोर पहात !
तिला ही आवडले असते—
हसरे थेंब नाच रे मोर …..
ते विहंगम दृश्य आणि हा
अस्ताव्यस्त महाकाय वृक्ष !
आज ती नाही ……
उद्या होईल कदाचित आपलीही तिच अवस्था ,
आपल्याला पहायचे असेल,
फिरायचे असेल रानोमाळ ,
पण दुर्लक्षिले जाऊ आपणही
तिच्यासारखेच !
तेव्हा आपल्यातरी कुठे लक्षात आले होते ते ??
उद्या “आपल्यांच्या “ही लक्षात रहाणार नाही आपण !त्या अजस्त्र वृक्षातळी ,
काल हसलो खिदळलो ……
पण आज जाणवतेय-
तेव्हाही हरवत होते काहीतरी ,आज ही हरवते आहे काही ……
त्या वृक्षातळी !!
© प्रभा सोनवणे,
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११
मोबाईल-9270729503