मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #1 -शब्द माझे ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे
श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । इस साप्ताहिक स्तम्भ में अपनी काव्याभिव्यक्ति के लिए उन्होने मेरे आग्रह को स्वीकारा। इसके लिए श्री अशोक जी का आभार। अब आप प्रत्येक मंगलवार उनकी कविता पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है उनकी कविता “शब्द माझे” )
☆ अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती ☆
☆ शब्द माझे ☆
शब्द माझे एवढे शालीन होते
सभ्यतेची आब ते राखून होते
वाह वा ऐकू न आली जाहलेली
आपल्या गाण्यात ते तल्लीन होते
देवळाच्या आत अन् बाहेर भिक्षुक
आत गुर्मी पायरीवर दीन होते
बोलतो भिंतीसवे कळते तिलाही
घर घराला एवढे लागून होते
बुरुज आता ढासळाया लागले का ?
प्रेम माझे हे कुठे प्राचीन होते
सांगतो ठोकून छाती या इथे मी
प्रेम का तू ठेवले झाकून होते ?
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८