मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #13 – माथी पत्थर ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे
श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक सामयिक एवं सार्थक कविता “माथी पत्थर”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 13 ☆
माथी पत्थर
चराचरावर तुझीच सत्ता जर आहे तर
चराचराला कशी लागली येथे घरघर
समृद्धीच्या दिल्यास चाव्या ज्यांच्या हाती
विज्ञानाच्या नावाखाली धरणी जर्जर
अतिरेकी अन् दारूगोळा करती गोळा
भीक मागती घरात त्यांच्या नाही भाकर
गगन व्यापुनी सारे येथे तिमिर बैसला
किती दिसांनी आज उगवला तेजोभास्कर
हिंस्त्र पशूंचे इथे टोळके फिरते आहे
धालत नाही कुणीच त्यांना येथे आवर
या देशाचे देणे घेणे नाही त्याला
लुटून देशा स्थावर जंगम केली जगभर
पुटीरवादी त्याला सवलत मिळते आहे
रक्षणकर्ता आहे त्याच्या माथी पत्थर
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८