मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 14 – वासरू……! ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।  मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ। पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजितजी की कलम का जादू ही तो है!  निश्चित ही श्री सुजित  जी इस सुंदर रचना के लिए भी बधाई के पात्र हैं। हमें भविष्य में उनकी ऐसी ही हृदयस्पर्शी कविताओं की अपेक्षा है। ऋण के बोझ तले दबे किसान को आत्महत्या करने से रोकने के लिए इससे बेहतर हृदयस्पर्शी कविता नहीं हो सकती ।  काश कोई उस किसान को उसके पुत्र/पुत्री की मनोव्यथा से अवगत करा सके।  प्रस्तुत है श्री सुजित जी की अपनी ही शैली में  हृदयस्पर्शी  कविता   “वासरू…! ”। )

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #14☆ 

 

☆ वासरू…! ☆ 

 

कसं सांगू

आजकाल शाळेत जायची सुद्धा

भिती वाटायला लागलीय…

जेव्हा पासून

माझ्या मित्राच्या बानं

कर्जापाई आत्महत्या केलीय ना

तेव्हापासून तर . . .

जरा जास्तच…,

शाळा सुटल्यावर कधी एकदा घरी येऊन

बापाला पाहतेय असं होत..

अन् बापाच्या कुशीत शिरल्यावर

काळजीचं भूत एकाएकी गायब होतं….

खरंच सांगतो बा मला

काहीच नको देऊ…

आणि आम्हाला सोडून बा . . .

तू कुठंच नको जाऊ….

दोन दिवस झाले बा. . . मी

कासरा दप्तरात घेऊन फिरतोय….

अन् तुझ्यासाठी जीव माझा

आतून हुंदके देऊन रडतोय…

बा.. तू समोर असलास ना

की भूक सुध्दा लागत नाही

अन् तुझ्या काळजीने

रात्र रात्र झोप सुध्दा

लागत नाही…..

काही झालं तरी बा…

आत्महत्ये सारखा विचार तू

डोक्यामध्ये सुध्दा आणू नको…

आणि तुझं हे वासरू

तुझ्यासाठी झुरतय इतकं

विसरू नको. . . !

 

© सुजित कदम, पुणे 

मो.7276282626