सुश्री आरूशी दाते
(प्रस्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की अगली कड़ी घर . सुश्री आरूशी जी के आलेख मानवीय रिश्तों को भावनात्मक रूप से जोड़ते हैं. सुश्री आरुशी के आलेख पढ़ते-पढ़ते उनके पात्रों को हम अनायास ही अपने जीवन से जुड़ी घटनाओं से जोड़ने लगते हैं और उनमें खो जाते हैं। घर मात्र दीवारों का बना नहीं होता. उसमे एक छत भी होती जिसके नीचे सुख दुःख, खट्टे मीठे प्रसंगों के साथ रिश्ते निभाए जाते हैं. सुश्रीआरुशी जी के संक्षिप्त एवं सार्थकआलेखों तथा काव्याभिव्यक्ति का कोई सानी नहीं। उनकी लेखनी को नमन। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ सकेंगे।)
साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #18
☆ घर ☆
नकोत नुसत्या भिंती…
हे वाक्य किती महत्वाचं आहे, नाही!
त्यात नकोत नुसती नाती… हेपण अगदी खरंय…
ह्या घरात, छताखाली आख्ख आयुष्य आकारास येतं, त्याचं आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे…. हो ना??
कशा साठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी हे जसं खरंय तसंच, आपण सगळं काही ह्या घरासाठी, घरातल्या मंडळींसाठी करत असतो. कितीही कष्ट घ्यावे लागले, अडचणी आल्या, सुख दुःख सहन करत, मायेच्या पदराखाली ह्या घरात जीवन जगत स्वतःला सावरत, नाकारत, स्वीकारत पुढे जात असतो. खस्ता खायला लागल्या तरी रात्रीची शांत झोप ह्याच घरात येते. मग ते घर काचेच असेल, सिमेंटचं असेल नाही तर मातीचं… घर असण्याने हुरूप येतो, एक आधार मिळतो. ह्यातील नाती आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देतात, आणि घर सांभाळताना येणाऱ्या अडचणींमधून जीवन समृद्ध करतात… त्यात घराला घरपण देणारी माणसं असतील तर सोने पे सुहागा, हो ना !
ह्या वास्तुसाठी झटायला लागतं, जपायला लागतं, वाढवायला लागतं तेव्हा कुठे आनंदी कुटुंबाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.
© आरुशी दाते, पुणे