मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #15 – अमृताचा गोडवा * ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे
श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक सामयिक एवं सार्थक कविता “अमृताचा गोडवा”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 15☆
अमृताचा गोडवा
गोडकंठी सूर अन् शब्दातही शालीनता
मधुरताही शरण येते रसिकतेची मान्यता
पाहडी आवाज होता रागही तो पाहडी
सप्तसूरांचे कबीले अन् पहाटे सांगता
संतही रंगून जाती कीर्तनाच्या संगती
आळवीताना प्रभूला त्यात वाटे धन्यता
सात सूरांचे हजारो राग झाले या इथे
वर्ज होतो सूर कोणी ना तरीही खिन्नता
कान माझे पीत होते अमृताचा गोडवा
मैफिलीचे काय वर्णू केवढा हा राबता