मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? मी_माझी – #19 – ☆ निर्णय…. ☆ – सुश्री आरूशी दाते
सुश्री आरूशी दाते
(प्रस्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की अगली कड़ी निर्णय…. . सुश्री आरूशी जी के आलेख मानवीय रिश्तों को भावनात्मक रूप से जोड़ते हैं. सुश्री आरुशी के आलेख पढ़ते-पढ़ते उनके पात्रों को हम अनायास ही अपने जीवन से जुड़ी घटनाओं से जोड़ने लगते हैं और उनमें खो जाते हैं। यह सत्य है कि अक्सर हमारी निर्णय क्षमता हमें जिद्दी बना देती है, जब हम यह कहते हैं कि मेरा निर्णय पक्का है. किन्तु, कई बार प्रकृति हमें निर्णय लेने का समय ही नहीं देती और जो घटना है वह घट जाता है , जिसे स्वीकार करने के अतिरिक्त कोई पर्याय नहीं रहता. सुश्रीआरुशी जी के संक्षिप्त एवं सार्थकआलेखों तथा काव्याभिव्यक्ति का कोई सानी नहीं। उनकी लेखनी को नमन। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ सकेंगे।)
साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #19
☆ निर्णय…. ☆
हो, माझा निर्णय पक्का आहे आणि त्यात मी अजिबात बदल करणार नाहीये…
हे वाक्य एकदम टिपिकल वाटतं नाही… जणू कोणीतरी स्वतःला सिद्ध करू पहातंय असं वाटतं किंवा कोणी तरी सांगत आहे की मी म्हणत्ये तेच ऐकायचं.
निर्णय… खूप मोठा शब्द आहे हा… कधी विचार केला आहे ह्याबद्दल… नाही म्हणजे, निर्णय घ्यायच्या आधी जीवाची होणारी तगमग, चीड चीड, भीती, हतबलता ह्यांचा विचारही नको असं कधी कधी वाटतं, त्या पेक्षा जे आहे तेच ठीक असंही वाटतं… पण जे आहे ते स्वीकारायला जी हिम्मत लागते तीपण नसते… मग त्यामुळे चीड चीड सुरू होते… मग नक्की काय करायचं? निर्णय काय असावा?
मनात अनेक विचार येत असतात, पण निर्णय क्षमता माणसाची जिद्द वाढवते. जर ही क्षमता नसेल तर ? अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल हे नक्की… कधी कधी परिस्थिती निर्णय घेऊ देत नाही, सगळे पर्याय संपले आहेत असं वाटू लागतं आणि एक प्रकारची हतबलता निर्माण होते, धीर सुटेल असं वाटू लागतं… निर्णय घेतल्यावर अडचणी येणार नाहीत असं म्हणायचं नाही. पण निर्णय घेतला की जे प्रसंग समोर येतील त्यांना तोंड देण्याची हिम्मत (धमक) असतील तरच त्याच्या वाटेला जावं. नाही तर न घर का न घाट का, अशी परिस्थिती येऊन ठेपेल…
निर्णय चुकीचा तर नाही ना, ह्या विवंचनेमध्येच बराच काळ हातातून निसटून जातो… साहजिक आहे म्हणा… ज्याची सवय झाली आहे त्यातून बाहेर पडून नवीन, वेगळं करायचं म्हटलं की टेन्शन येणारच. पण जर आपण आपल्या मतावर ठाम असू तर बदल स्वीकारला जातो, जे खूप आवश्यक आहे…
आता बदल म्हटला की अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी आल्याचं. अर्थात त्या पूर्वी ही होत्या, आता फक्त एवढंच आहे की नवीन गुंतागुंत समोर येते, पण कदाचित ती अपेक्षित असते म्हणून आपण त्यातून लवकर मार्ग काढू शकतो किंवा त्या गुंतागुंतीचा त्रास आपल्याला कमी होतो कारण निर्णय आपण घेतलेला असतो…
तेव्हा मला तरी असं वाटतं, की जे आहे ते स्वीकारावे, ह्या निर्णयावर ठाम राहा, नाही तर बदल घडवून आणण्याचा निर्णय घ्या.
© आरुशी दाते, पुणे