मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ रंजना जी यांचे साहित्य #-15 – कधी प्रेम माझे समजशील सूर्या ☆ – श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं। सुश्री रंजना एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं। सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से जुड़ा है एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है। निश्चित ही उनके साहित्य की अपनी एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है पृथ्वी , सूर्य एवं प्रकृति के काल्पनिक प्रेम पर आधारित कविता – “कधी प्रेम माझे समजशील सूर्या”। )
साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य #- 15
कधी प्रेम माझे समजशील सूर्या
(वृत्त- लगावली- लगागा लगागा लगागा लगागा )
युगे लोटली रे फिरावे किती मी।
कधी प्रेम माझे समजशील सूर्या।
कितीदा नव्याने स्मरावे तुला मी
कधी साद हृदयात गुंजेल सूर्या?
असे रोज वेळेत येणे नि जाणे।
कधी तू जिवाला रमवशील सूर्या।
तुला सावलीचे असे वावडे का?
कधी खेळ खेळात हरशील सूर्या?
उगा अट्टहासे किती तापसी रे
तलम प्रेम धागे उसवशील सूर्या ?
नको तापवू रे जरा शांत होई।
किती या धरेला ठकवशील सूर्या ?
जरी पारदर्शी तुझी कार्य कीर्ती।
परी डाग दुनियेस दिसतील सूर्या
किती गूज चाले नभी तारकांचे।
खुळे भास त्यांचे पुसशील सूर्या ।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105