सुश्री आरूशी दाते

 

(प्रस्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की अगली कड़ी मैत्री… स्वतःची स्वतःशीच… सुश्री आरूशी जी  के आलेख मानवीय रिश्तों  को भावनात्मक रूप से जोड़ते  हैं.  सुश्री आरुशी के आलेख पढ़ते-पढ़ते उनके पात्रों को  हम अनायास ही अपने जीवन से जुड़ी घटनाओं से जोड़ने लगते हैं और उनमें खो जाते हैं।  मित्रता स्वयं की स्वयं सेसुश्री आरुशी जी का विमर्श अत्यंत सहज किन्तु गंभीर है.  सुश्रीआरुशी जी के  संक्षिप्त एवं सार्थकआलेखों  तथा काव्याभिव्यक्ति का कोई सानी नहीं।  उनकी लेखनी को नमन। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़  सकेंगे।) 

 

 साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #21

 

☆ मैत्री… स्वतःची स्वतःशीच…☆

 

मैत्री… स्वतःची स्वतःशीच…

हम्म, पचायला थोडं जड आहे पण अतिशय आवश्यक… ही मैत्री साधायचा प्रयत्न चालू आहे…

गेल्या काही महिन्यात घडलेल्या घडामोडी ह्या मैत्रीला कारणीभूत आहेत… नक्कीच…

वेळ प्रसंगी कुटुंबीय, ऑफिस कलीग, अनेक मित्र मैत्रिणी सपोर्ट करायला असतात… पण आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार…

असो…

आपण हल्ली खूप busy असतो, नाही का?? आधी शिक्षण, नोकरी, मग छोकरी, मग पोटची छोकरी, आई वडील, मित्र मैत्रिणी, घर दार, प्रत्येक ठिकाणी we want to prove ourselves and want to be at par with everybody else… at any cost …!

सगळं दुसऱ्यांसाठी, ह्या जगासाठी करत राहायचं, पण मग स्वतःसाठी कधी करणार… ?

वेळ कुठे आहे !

तुम्ही म्हणाल दुसऱ्यांसाठी म्हणजे नवरा बायको मुलं, आई वडील ह्यांच्यासाठीच तर करतोय, त्यात काय अयोग्य आहे… करायलाच पाहिजे… पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये, मी माझ्यासाठी काही करतोय का??? का फक्त घरातील इतर मंडळी खुश झाली की मी खुश होणार आहे??? Is my happiness dependent on them??? ते नसतील तर मला आनंदी होता येणार नाही का ??? मग मी useless, hopeless होते का ???

स्पर्धा असणारच, ती असावीच त्याशिवाय आपण अंगभूत गुणांना ओळखुच शकणार नाही… असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असा विचारही घातकच… अन्न, वस्त्र, निवारा ह्यासाठी हात पाय हलवले पाहीजेतच… आज काल आम्ही एवढे busy आहोत की काय अन्न खातो, कधी खातो, ह्याचा हिशोब नाही… वस्त्र मात्र एकदम stylish परिधान करतो… बाहेरून सगळं चकाचक… पण निवारा… त्यासाठी रक्ताचं पाणी करतो आणि ते करत असताना ह्या निवाऱ्यात थांबायला वेळच नसतो… त्यामुळे आपण कोणत्या स्पर्धेत उतरायचं आहे, त्यासाठी कुठली जब्बाबदरी घ्यावी लागेल, काय तयारी करावी लागेल, ह्याचा अभ्यास आपण करतो का??? त्याचे pros n cons बघतो का ??? ह्यातून जे हाती लागणार आहे तेच उलतीमते आहे का??? कधी स्वतःचा स्वतःशी असा संवाद केलाय, झालाय … ही मैत्री कधी अनुभवली आहे का???

काल youtube वर एक व्हिडिओ पाहत होते… त्यात असा उल्लेख आहे की,

Your life is just a thought away…

बाबो, केवढा गहन अर्थ दडला आहे ह्या वाक्यात… लगेच तो विडिओ स्टॉप केला आणि विचार करू लागले… किती योग्य आणि खरं वाक्य आहे… आपल्या मनातील विचार सगळं ठरवत असतात…

उदाहरणार्थ…

आपण रस्त्यावरून जात आहोत, समोर एक व्यक्ती तिला आवडलेला ड्रेस घालून दुकानापाशी उभी आहे… आणि गम्मत म्हणजे आपल्याला नेमका तोच माणूस दिसतो आणि त्याचा ड्रेस अजिबात आवडत नाही… झालं… आपले विचार चक्र सुरू होते…

इ हा काय ड्रेस घातलाय, काय पण रंग आहे, त्याला अजिबात सूट होत नाहीत, त्याला एवढपण कळत नाही का, बरं त्याला नाही कळलं तर त्याच्या बायकोला कळत नाही का??? एक नाही, हजारो प्रश्न म्हणजेच विचार आपण काही ही कारण नसताना तयार करतो… ह्याचा त्या व्यक्तीवर काहीच फरक पडत नाही… आपण आपल्या अपेक्षांचं ओझं त्याच्यावर टाकायचा प्रयत्न करतो, पण मन अस्वस्थ कोणाचे होते???

ह्यापुढे जाऊन आपण ही गोष्ट आपल्या मित्र मैत्रिणींना पण अगदी हिरीहीरीने सांगतो… तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी आपल्याला हे करत असताना एक प्रकारचा आनंद मिळतो …कारण तो माणूस किती तुच्छ आहे हे आपण prove केलेलं असतं… आणि आपली अपेक्षा तो माणूस पूर्ण करू शकत नाही ह्याची खंत झाकायची असते… पण पुन्हा तीच अस्वस्थता… म्हणजे पुन्हा स्ट्रेस…

अजून एक उदाहरण घेऊ या…

आपण एखादा चित्रपट पाहून आलो, खूप आवडला असेल तर त्याची वाहह वा करतो, त्यातील गाणी, अभिनय, फोटोग्राफी, ह्याचा विचार करू लागतो… मित्र मैत्रिणींना सांगतो… एक प्रकारचा आनंद मिलतो… कारण त्या चित्रपटाविषयी आपल्या अपेक्षा पूर्ण झालेल्या असतात… पुन्हा स्ट्रेस…. पौसिटीव्ही स्ट्रेस…

म्हणूनच मला पटलं, my life is just a reminder thought away… स्वतःची स्वतःशी असलेली मैत्री…

आजू बाजूला घडणाऱ्या गोष्टी आपल्याला प्रभावित करत असतात… आणि त्यात आपण वाहून जातो… कुठवर वाहून जायचं, it’s just a thought away… त्या क्षणी येणारा विचार तुम्हाला त्या प्रवाहातुन वाचवू शकतो नाही तर तुमचा जीवही घेऊ शकतो…

विचार चक्र चालू राहणं हे नैसर्गिक आहे… पण कुठला विचार कधी करावा, का करावा, किती करावा… हा लूप आपणच तयार करतो, तो योग्य वेळी योग्य ठिकाणी तोडता आला पाहिजे.. ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे… त्यासाठी स्वतःची स्वतःशी मैत्री होणं आवश्यक आहे… सोप्प नाहीये, त्यासाठी खूप awareness लागतो… पण केलं तर नक्की जमेल, ह्याची खात्री आहे… पण ही मैत्री खरंच चिरकाल राहील…

 

© आरुशी दाते, पुणे 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments