सुश्री अरुणा मुल्हेरकर
परिचयः
गेल्या आठ वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य.
शिक्षणः एम्.ए. एलफिन्स्टन काॅलेज, मुंबई युनिव्हर्सिटी.
संगीत विशारद~ अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय.
गद्य/पद्य लेखनाची आवड!
☆ सूर संगत ☆ सूर संगीत 2 – राग~काफी ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆
मागील लेखांत यमन रागाविषयी लिहिल्यानंतर आज काफी रागाचा परिचय करावा असे मनांत आहे.
कल्पद्रुमांकूर या पुस्तकांत चार ओळीत काफी रागाचे वर्णन आहे.
“काफी रागो भुवनविदितः कोमलाभ्यां गनिभ्यां।
मन्यैस्तीव्रैः परममधुरः पंचमो वादीरूपः।।
संवादी स्यात् स इह कतिचिद्वादिनं गं वदंति।
सांद्रस्निग्धं सरसितिर्भिर्गीयतेsसौ निशायाम।।
अर्थात सर्वांना माहीत असलेला हा राग अतिशय मधूर आहे. गंधार व निषाद कोमल आहेत. वादी पंचम,संवादी षड् गायन समय मध्यरात्र जाति संपूर्ण
आरोहः सा रे ग(कोमल)म प ध नि(कोमल) सां
अवरोहः सां नि(कोमल) ध प म ग(कोमल) रे सा
सर्व रागांना सामावून घेणार्या विशाल र्hridayii
थाटांतील हा जनक राग! ” अतहि सुहावन लागत निसदिन” असे या रागिणीचे पारंपारिक लक्षणगीतांतून वर्णन केले आहे.एक अत्यंत श्रुतिमधूर रागिणी म्हणून ती रसिकांच्या पसंतीस उतरली आहे कोमल गंधार व निषाद आणि शेष स्वर शुद्ध असलेली ही रागिणी थाटांतील स्वरांचे पालन करते,परंतु कंठाच्या सोयीसाठी याच्या उत्तरार्धात म प ध नि सां असा कोमल निषाद लावणे कठीण जाते म्हणून शुद्ध निषाद लावण्याची मुभा आहे, तसेच पुर्वार्धात क्वचित शुद्ध गंधार घेण्यास परवानगी आहे.मधुनच असा प्रयोग कलात्मकही वाटतो.मात्र वारंवार हा प्रयोग अमान्य आहे,त्यामुळे रागाच्या शुद्धतेला बाधा येईल व रसहानीही होईल.
रागाचे स्वरूप सा सा रे रे ग ग(कोमल) म म प——, रेप मप धप, धनि(कोमल) धप रेप मप मग(कोमल) रेसा अशा स्वर समूहाने स्पष्ट होते.
ख्याल गायनासाठी हा राग प्रचलित नाही.ठुमरी,दादरा,टप्पा,होरी वगैरे उपशास्रीय गायन प्रकारांत हा प्रामुख्याने वावरतांना दिसतो.याचे कारण ह्या रागाचे अंग श्रृंगार रसपरिपोषक आहे. मध्य लयीत बांधलेल्या पारंपारिक बंदिशी पाहिल्या असता असे दिसून येते की त्या राधा कृष्ण, रास लीला, कृष्णाचे गोपींना छेडणे याचेच वर्णन करणार्या आहेत.जसे “काहे छेडो मोहे हो शाम” किंवा “जिन डारो रंग मानो गिरिधारी मोरी बात”, “छांडो छांडो छैला मोरी बैंया दुखत मोरी नरम कल्हाई वगैरे.
ठुमरी दादरा प्रकारातही “बतिया काहे को बनाई नटखट कुवर कन्हाई” “मोहे मत मारो शाम भरके रंग तुम पिचकारी” अशीच काव्यरचना असते.
काफी रागावर आधारीत “एक लडकीको देखा तो ऐसा लगा”~1942 लव्ह स्टोरी
“हर घडी बदल रही है धूप जिन्दगी”~कल हो ना हो ही चित्रपटांतील गाणी सर्व श्रुत आहेत.
याठिकाणी असे सांगावेसे वाटते की कलावंताला या शास्राचे नुसते संपूर्ण ज्ञान असणे पुरेसे नाही.कलाविष्कार करतांना योग्य ती रसोत्पत्ती झाली तरच रसिकांचे मन जिंकतां येते.नाट्यशास्रानुसार रागाच्या अभिव्यक्तीचा विचार होणे अत्यावश्यक आहे. नाट्यांतील प्रसंग दृष्य स्वरूपाचे असतात.त्याचा योग्य तो परिणाम साधण्यासाठी नेपथ्य, पात्र,वाच्य या गोष्टींची योजना केली असते. साहित्यांत दृष्याचे वर्णन असते. स्वरभाषेत या तत्वांची फक्त जाणीव असते.स्वरभाषेतून श्रोते,रसिकजन आंतरिकरित्या योग्य तो परिणाम अनुभवत असतात. कलाकाराने रागाचे सादरीकरण करतांना त्या त्या रागांच्या भावाला अपेक्षित अनुकूल सांगितिक वातावरण निर्मिती केली नाही तर मैफीलीत रंग भरणार नाही. जो कलावंत रागभावाच्या पूर्ण स्वरूपाची जाण श्रोत्यांच्या मनांत संक्रमित करतो तोच खरा यशस्वी कलाकार!
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
अतिशय मार्मिक मागोवा घेण्याचा एक सकस आणि अभिनंदनीय प्रयत्न पण मनांत भावला.मी सूत्रसंचालन निवेदक कार्य परिश्रमपूर्वक करीत असताना उदाहरण द्यायचे तर सा रे ग म चे निरंजन बोबडे यांच्या बरोबर नेहमीच करते तेंव्हा ते गाणं वेळेवर देतात आणि काही कार्यक्रमाच्या पूर्वी खरा कस लागतो तो तिथेच तद्वतच रागाचे हे सर्व पैलू समजून समजणे समजून घेणे आवश्यक आहे हे लक्षात घ्यायला हवे.
मनापासून अभिनंदन आवडले ताई शुभेच्छा लिखाणाला ?????????♀️?? तसेच ज्यांनी यासाठी सहकार्य केले ते आ.बावनकर आणि समूहाचेही मनापासून अभिनंदन करते??????????♀️??
अभिनेत्री कलाकार कवयित्री लेखिका मीरा भागवत “मितेश्री” नागपूर???