मराठी साहित्य ☆ कविता ☆ स्वच्छतेचा देवदूत. . . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। आज प्रस्तुत है राष्ट्र संत बाबा गाडगे जी महाराज पर उनकी काव्यात्मक अभिव्यक्ति स्वच्छतेचा देवदूत. . . ! )

 

 ☆  स्वच्छतेचा देवदूत. . . !  ☆

(श्री विजय सातपुते जी की फेसबुक वाल से साभार )

( अष्टाक्षरी )

चिंध्या पांघरोनी बाबा धरी मस्तकी गाडगे

डेबुजी या बालकाने दिले स्वच्छतेचे धडे. . . . !

 

विदर्भात कोते गावी ,जन्मा आली ही विभूती.

हाती खराटा घेऊन ,स्वच्छ केली रे विकृती. . . !

 

वसा लोकजागृतीचा ,केला समाज साक्षर

श्रमदान करूनीया ,केला ज्ञानाचा जागर.

 

झाडूनीया माणसाला ,स्वच्छ केले  अंतर्मन.

धर्मशाळा गावोगावी ,दिले तन, मन, धन. . . . !

 

देहश्रम पराकाष्ठा, समतेची दिली जोड

संत अभंगाने केली ,बोली माणसाची गोड.. . !

 

धर्म, वर्ण, नाही भेद ,सदा साधला संवाद

घरी दारी, मनोमनी , गोपालाचा केला नाद. . . !

 

स्वतः कष्ट करूनीया , सोपी केली पायवाट

संत गाडगे बाबांचा  ,वर्णीयेला कर्मघाट .. . . !

 

स्वच्छतेचा देवदूत ,मन ठेवतो निर्मळ

राष्ट्रसंत बाबा माझा ,प्रबोधन परीमल.. . . !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.