श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “द लास्ट कोर्टेसान” – लेखक – श्री मनीष गायकवाड़ ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : द लास्ट कोर्टेसान (मराठी)
लेखक : मनीष गायकवाड
पाने : १९४
मूल्य : ३००₹
एक तवायफच्या आयुष्याचा वेगळा पट उलगडणारी कादंबरी…
१९८० च्या दशकात कोठ्यांना अभिजात कलेचा मान मिळत नव्हता. तो अदाकारीच्या वेषात असलेला वेश्याव्यवसाय आहे, अशी समाजाची समजूत होती. त्यामुळे तवायफच्या कलेला नाकारले गेले. अशा काळात रेखाबाईंनी कलकत्ता आणि बॉम्बेमध्ये एक गायन- नृत्य करणारी प्रसिद्ध कलावंत म्हणून नाव कमावले.
तो एक काळ होता, जेव्हा तिला बंदुका, गुंड आणि गालिबच्या गझलांना हुलकावणी देऊन स्वतःची नियती घडवायची होती. मोठ्या कुटुंबाचा गुजारा करायचा होता. शिवाय मुलाला इंग्रजी माध्यमाच्या बोर्डिंग स्कूलमध्ये वाढवायचे होते.
हृदयस्पर्शी आठवणीत, तिने कधीही बेताल न होता आपल्या मुलाजवळ तिच्या जगण्याची भावनांनी ओतप्रोत भरलेली अविश्वसनीय कहाणी प्रामाणिकपणे, औचित्यपूर्ण आणि खेळकर शैलीत कथन केली आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
वंदेमातरम् सुप्रभातम्
पुस्तक परिचय करून दिल्याबद्दल आभार
अ.ल. देशपांडे, उमरीकर अमरावती.
9225705884