श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “मृत्यू… एक अटळ सत्य” – लेखक – सद्गुरु ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : मृत्यू.. एक अटळ सत्य
लेखक : सद्गुरू
पृष्ठ: ३९१
मूल्य: ३९९₹
मृत्यू किंवा मृत्यूबद्दलचा उल्लेखही अनेक समाजांमध्ये निषिद्ध मानला जातो. पण आपला हा दृष्टिकोन पूर्णपणे चूक असला तर? मृत्यूकडे एक आपत्ती म्हणून नाही, तर जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू, ज्यामध्ये आध्यात्मिक उन्नतीच्या अनेक शक्यता दडल्या आहेत, अशा प्रकारे पाहता येईल का? अगदी पहिल्यांदाच कोणीतरी हे सांगत आहे.
या अगदी विलक्षण पुस्तकातून, सद्गुरू त्यांच्या आंतरिक अनुभवाच्या प्रगाढ सामर्थ्यातून, मृत्यूबद्दल क्वचितच बोलले जातील, अशा काही पैलूंचा उलगडा करतात. एखाद्याने त्याच्या मृत्यूसाठी कशा प्रकारे तयारी करावी, मृत्युशय्येवर असणाऱ्या कोणासाठी आपण काय करू शकतो आणि मृत्यूनंतरच्या त्यांच्या प्रवासासाठी कशी मदत होऊ शकते, या सर्व गोष्टींबद्दल एका अतिशय व्यवहारी दृष्टिकोनातून ते आपल्याला सांगतात.
सर्वांनी जरूर वाचावेच असे आहे हे पुस्तक.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈