श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “संभाजी” – लेखक – श्री विश्वास पाटील – परिचय – श्री आदित्य पाटील ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : संभाजी 

लेखक : श्री विश्वास पाटील  

प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे 

पृष्ठ: ८६८  

मूल्य: ७९५ ₹

स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र छत्रपती श्री संभाजी राजे ह्यांचं आयुष्य एकूणच वादळ होतं. एका युगपुरुषांच्या पोटी जन्म घेऊन, जिजाऊमातासारख्या एका युगस्त्रीच्या सहवासात लहानाचे मोठे होणाऱ्या छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्याभोवती बदनामीची वलयं फिरत राहिली. राज्यकारभारयांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यातील हस्तक्षेप, गृहकलह‌, फंदफितुरी या युद्धाच्या आयुष्यात वादळासारख्या वावरत होत्या. वयाच्या दुसऱ्या वर्षी आईचा मृत्यू, कोणत्या वयात बोट भरून चालला शिकवणाऱ्या आजीचा मृत्यू ह्यांसारखी असंख्य संकट पार करत शंभूराजांनी आपलं नाव इतिहासात अजरामर केलं.

विश्वास पाटील लिखित संभाजी ही कादंबरी खऱ्या अर्थाने संभाजीराजांच्या आयुष्याची सर्वांगांनी ओळख करून देते. अनेक इतिहासकार संभाजी राजांचे चरित्र मलीन करण्यात व्यस्त होते, अनेक लेखक यांना बदफैली ठरवत असताना अनेक सुजाण लेखक, इतिहासकारांनी संभाजी राजांच्या चरित्राला न्याय दिला. त्याचेच एक उदाहरण म्हणजे ही कादंबरी. शिवरायांच्या घरातील अंतर्गत वाद ते संभाजीराजांनी रणांगणी चौखूर नाचवलेला घोडा सगळंच वर्णन अगदी ओघवत्या आणि रसाळ भाषेत लेखक विश्वास पाटील यांनी केलं आहे.

छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य गिळंकृत करायला आलेल्या औरंगजेबाला संभाजीराजांनी एक किल्ला लढवण्यासाठी सहा ते सात वर्ष झुंज दिली. जंजिर्‍याच्या सिद्दीला धाकात ठेवलं, पोर्तुगीजांना पुरतं नेस्तनाबूत केलं. पण मराठ्यांच्या फंद फितुरीमुळे वैरयाने डाव साधला आणि संभाजी राजे इतिहासात अमर झाले.

एकूणच कादंबरी मोठी आहे परंतु वाचनाची आणि मनाची पकड इतिहास सहज घेते की अवघ्या पंधरा दिवसात मी कादंबरीचा फडशा पाडला. मात्र शेवटची शंभर-दीडशे पानं माझी नेत्रकडा कोरडी ठेवू शकली नाहीत.

सरतेशेवटी इतकेच सांगू इच्छितो – बदनामी बदफैलीच्या काळ्याकुट्ट ढगांनी कितीही झाकोळण्याचा प्रयत्न केला तरीही सुर्यरूपी शंभू चरित्र कायमच जनमानसांत प्रेरणारुपी प्रकाश देत राहील.

सर्व शिव शंभू भक्त आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने ही कादंबरी वाचायला हवी.

परिचय : आदित्य पाटील 

प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

खूप छान पुस्तक परिचय