मराठी साहित्य – ☆ मराठी कविता ☆ श्रीतुळजाभवानी मातेस सविनय अर्पण ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. आज उनकी कविता धार्मिक एवं सामयिक है. उनके ही शब्दों में – “आज दिनांक:-५-१०-१९ रोजी श्रीक्षेत्र तुळजापूर येथील श्रीभवानी मातेच्या आजच्या फोटोवरून विनाविलंब रचिलेल्या चारोळ्या श्रीतुळजाभवानी मातेस सविनय अर्पण” – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे)
☆ श्रीतुळजाभवानी मातेस सविनय अर्पण ☆
श्रीविष्णूदेव असती
शेषाच्या शय्येवरती
अंबामाता घेत होती
नेत्रकमळी विश्रांती !!१!!
मलापासून निर्माण
झालेल्या दोन दैत्यांचा
ब्रह्मदेवे केली स्तुती
अंबा वध करी त्यांचा !!२!!
श्रीविष्णूंनी केली शैय्या
अंबामातेस अर्पण
शेषशायी अलंकारे
तिचे होतसे पूजन !!३!!
©®उर्मिला इंगळे, सातारा
दिनांक:-५-१०-१९
!!श्रीकृष्णार्पणमस्तु !!