मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 7 ☆ डोंगर दऱ्या ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है. श्रीमती उर्मिला जी के    “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होतं आहे रे ”  की अगली कड़ी में आज प्रस्तुत है  उनकी  भावप्रवण कविता  डोंगर दऱ्या.  श्रीमती उर्मिला जी  के द्वारा ग्राम्य परिवेश का शब्द चित्र अत्यंत मोहक है  एवं  नेत्रों के सम्मुख  एक सुन्दर ग्राम का सम्पूर्ण  दृश्य परिलक्षित होता है. श्रीमती उर्मिला जी  को ऐसी सुन्दर कविता के लिए हार्दिक बधाई. )

 

☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 7 ☆

 

☆ डोंगर दऱ्या ☆

 

माझ्या म्हायेरास्न आईनं सांगावा धाडला!

सुटीत पोरास्नी घिऊन ये की, महाडला !

 

आठव आली मला माज्या देखन्या गावाची !

लगबगीनं तयारी केली मी

आईकडं जान्याची !

आई म्हनं वाट वळनावळनाची  लागती तुला गाडी !

रित्यापोटी नग निगूस ,खा आवळ्याची वडी !!

 

निसर्गातल्या कुशीतलं देखनं माज गाव !

हायती धा बारा घरं आन् येकच बाव !

भातखाचरातनं चालल्यात पान्याचं पाट !

पुलाजवळ उभी -हाऊन यस्टी बगं प्यासेंजरची वाट !!

 

डोंगरदऱ्यातंन व्हात्यात

झुळुझुळू झरं. !

साऱ्या रस्त्यानं कोसळत्यात धबाबा धबधबं !!

ल ई छान रंगीबेरंगी फूलपाखरांचं थवं !

थुईथुई नाचत्यात मोर फुलवून सुंदर पिसारं !!

 

डोंगरघाटातनं गेल्याव दिसं  रांगड गाव छान !

हिरवंहिरवं गालिचे अन् पाचूचं रान !

गोठ्यात शेपूट हालवीत बघं

देखनी कपिला गाय !

हाती भाकरतुकडा घिऊन दारी हुबी माजी माय !!

 

©® उर्मिला इंगळे, सातारा

!! श्रीकृष्णार्पणमस्तु !!