मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 8 ☆ चामुण्डेश्वरी – चरणावली ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है. श्रीमती उर्मिला जी के “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होतं आहे रे ” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है उनकी कविता चामुण्डेश्वरी – चरणावली जो वैद्यकीय विषय पर आधारित प्रयोगात्मक कविता है. श्रीमती उर्मिला जी को ऐसी सुन्दर कविता के लिए हार्दिक बधाई. )
☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 8 ☆
☆ चामुण्डेश्वरी – चरणावली ☆
(नवदुर्गांची औषधी न ऊ रुपे)
उपासना नवरात्री
आदिमाया देवीशक्ती
महालक्ष्मी महाकाली
बुद्धी दात्री सरस्वती !!१!!
नवरात्री तिन्हीदेवी
युक्त असे नवू रुपे
औषधांच्याच रुपात
जगदंबेची ती रुपे !!२!!
श्रीमार्कण्डेय चिकित्सा
नवु गुणांनी युक्त ती
श्रीब्रह्मदेवही त्यास
दुर्गा कवच म्हणती !!३!!
नवु दुर्गांची रुपे ही
युक्त आहेत औषधी
उपयोग करुनिया
होती हरण त्या व्याधी!!४!!
शैलपुत्री ती पहिली
रुप दुर्गेचे पहिले
हिमावती हिरडा ही
मुख्य औषधी म्हटले!!५!!
हरितिका म्हणजेच
भय दूर करणारी
हितकारक पथया
धष्टपुष्ट करणारी!!६!!
अहो कायस्था शरीरी
काया सुदृढ करीते
आणि अमृता औषधी
अमृतमय करीते !!७!!
हेमवती ती सुंदर
हिमालयावर असे
चित्त प्रसन्नकारक
ती तर चेतकी असे!!८!!
यशदायी ती श्रेयसी
शिवा ही कल्याणकारी
हीच औषधी हिरडा
सर्व शैलपुत्री करी !!९!!
ब्रह्मचारिणी दुसरी
स्मरणशक्तीचे वर्धन
ब्राह्मी असे वनस्पती
करी आयुष्य वर्धन!!१०!!
मन व मस्तिष्क शक्ती
करिते हो प्रदान ही
नाश रुधीर रोगाचा
मूत्र विकारांवर ही!!११!!
रुप तिसरे दुर्गेचे
चंद्रघण्टा नाम तिचे
चंद्रशूर, चमशूर
करी औषध तियेचे !!१२!!
चंद्रशूरच्या पानांची
भाजी कल्याणकारिणी
चर्महन्ती नाव तिचे
असे ती शक्तीवर्धिनी !!१३!!
चंद्रशूर, चंद्रचूर
कमी लठ्ठपणा करी
अहो हृदय रोगाला
हे औषध लयी भारी !!१४!!
रुप चवथे दुर्गेचे
तिला म्हणती कुष्माण्डा
आयुष्य वाढविणारी
तीच कोहळा कुष्माण्डा!!१५!!
पेठा मिठाई औषधी
पुष्टीकारी असे तीही
बल वीर्यास देणारी
युक्त हृदयासाठी ही !!१६!!
वायू रोग दूर करी
कोहळा सरबत ही
कफ पित्त पोट साफ
खावा कुष्माण्ड पाकही!!१७!!
रुप दुर्गेचे पाचवे
ही उमा पार्वती माता
हीच जवस औषधी
कफनाशी स्कंदमाता !!१८!!
रुप सहा कात्यायनी
म्हणे अंबाडी,मोईया
कण्ठ रोग नाश करी
हीच अंबा,अंबरिका !!१९!!
हिला मोईया म्हणती
हीच मात्रिका शोभते
कफ वात पित्त कण्ठ
नाश रोगांचा करीते !!२०!!
रुप दुर्गेचे सातवे
विजयदा,कालरात्री
नागदवण औषधी
प्राप्त विजय सर्वत्री !!२१!!
मन मस्तिष्क विकार
औषध विषनाशिनी
कष्ट दूर करणारी
सुंदर सुखदायिनी !!२२!!
रुप दुर्गेचे आठवे
नाम तिचे महागौरी
असे औषधी तुळस
पूजतात घरोघरी !!२३!!
रक्तशोधक तुळशी
काळी दवना,पांढरी
कुढेरक,षटपत्र
हृदरोग नाश करी!!२४!!
रुप दुर्गेचे नववे
बलबुद्धी विवर्धिनी
हिला शतावरी किंवा
अहो म्हणा नारायणी !!२५!!
बलवर्धिनी हृदय
रक्त वात पित्त शोध
महौषधी वीर्यासाठी
योग्य हेच हो औषध !!२६!!
दुर्गादेवी नवु रुपे
अंतरंग भक्तीमय
करु औषधी सेवन
होऊ सारे निरामय !!२७!!
साभार:- लेखक:-विवेक वि.सरपोतदार
लेखक भारतीय विद्येचे lndologist व आयुर्वेद अभ्यासक.
संकलन :- सतीश अलोणी.
©®उर्मिला इंगळे, सातारा
दिनांक:-४-१०-१९
!!श्रीकृष्णार्पणमस्तु !!