श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है. श्रीमती उर्मिला जी के “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होतं आहे रे ” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है उनकी कविता श्रीदासबोधाची शिकवण जो श्री दासबोध की शिक्षा पर आधारित है. यह शिक्षा सामजिक सरोकार से सम्बन्ध रखती है एवं सकारात्मक दृष्टिकोण के साथ समाज के सर्वांगीण उत्थान की प्रेरणा देती है. श्रीमती उर्मिला जी को ऐसी सुन्दर कविता के लिए हार्दिक बधाई. )
☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 10 ☆
☆ श्रीदासबोधाची शिकवण ☆
श्रीरामाचा मंत्र जपोनि करुया शुद्धी चित्ताची !
चला मुलांनो शिकवण घेऊ आपण दासबोधाची !!धृ.!!
धर्म भ्रष्टण्या काळ ठाकला !
उसळतसे हैवान पहा!
देव धर्म भगिनी मातांचा ,
विध्वंस मांडला कसा पहा !!
दुष्कृत्याच्या प्रतिकारास्तव कास धरुन हनुमंताची !!१!!
चला मुलांनो शिकवण घेऊ आपण दासबोधाची !!१!!
बुद्धी बलाच्या संगमताने
कुविचारांचा ऱ्हास करु
सुविचारांची करु पेरणी
सद्भावांना हाती धरु!
वाढवू शक्ती ऐक्याची !
संघटना करु नीतिची!!२!!
चला मुलांनो शिकवण घेऊ आपण दासबोधाची!!२!!
शिक्षणाच्या पवित्र क्षेत्री!
लुडबुड लबाड लांडग्यांची !
ज्ञानयज्ञातही सत्ता चाले!
राजकारणी धनदांडग्यांची!
उभे ठाकूया तोंड द्यावया
असल्या पढतमूर्खांची !!३!!
चला मुलांनो शिकवण घेऊ आपण दासबोधाची!!३!!
शिकवू मुलगी करु हुषार !
दुबळी मुळी नच ती राहणार !
स्वाभीमानाचा करुनीजागर !
हिंमत तिची वाढवणार!
स्वसंरक्षाणास्तव स्वयंसिद्धा ती होणार !
सुवर्ण पदके जिंकून आणून!
होई देशाची ती शान !
होई देशाची ती शान !!४!!
श्रीरामाचा मंत्र जपोनि !
करुया शुद्धी चित्ताची!
चला मुलांनो शिकवण घेऊ आपण दासबोधाची!!
आपण दासबोधाची!!
“जय जय रघुवीर समर्थ “!