मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होत आहे रे # 11 ☆ चिंतामणी चारोळी ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है. श्रीमती उर्मिला जी के    “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होतं आहे रे ”  की अगली कड़ी में आज प्रस्तुत है  उनकी कविता चिंतामणी चारोळी जो श्री गणेश जी  का प्रासादिक वर्णन किया गया है।  श्रीमती उर्मिला जी को ऐसी सुन्दर कविता के लिए हार्दिक बधाई. )

 

☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 11 ☆

☆ चिंतामणी चारोळी ☆

(माझ्या “चिंतामणी चारोळी “संग्रहातील श्रीगणेशाचे प्रासादिक वर्णन करणाऱ्या न ऊ चारोळ्या)

पंच जगदीश्वरांच्या

पहा अनुग्रहास्तव

प्रकटले श्रीगणेश

श्रेष्ठतम मोरगाव !!१!!

 

श्रीगणेश सार्वभौम

असे वर्णिली देवता

स्तुती अखंड करुनी

पावते गणेश भक्ता !!२!!

 

सीता शोध घेण्यासाठी

रामे दण्डकारण्यात

भालचंद्रा प्रार्थियेले

लक्षुमणा समवेत !!३!!

 

सिद्धाश्रम परभणी

गणेश गुरुपीठत्व

नाम असे ते प्रसिद्ध

गोदावरी तीरी सत्व!!४!!

 

ओझरास विघ्नासुरा

गणेशाने संहारिले

असे त्या विघ्नेश्वरास

सार्वभौम गौरविले !!५!!

 

पाच भूमिका चित्ताच्या

करणारा चिंतामणी

ब्रह्मदेवे दिला हार

म्हणूनिया चिंतामणी!!६!!

 

ढुंढिराज काशीक्षेत्र

सोळा कला अधिपती

आद्य दैवत हिंदूंचे

कार्यारंभी पूजीताती !!७!!

 

हेळवीचा श्रीगणेश

तो प्रसिद्ध कोकणात

रुप ॐकार प्रधान

मान विशेष देशात !!८!!

 

स्वायंभूव गणेशाचे

अक्रा गणेश प्रकार

क्षेत्र स्तुती ही वेदांत

चिंता तो हरविणार !!९!!

 

©®उर्मिला इंगळे

दि.२१-१०-१९

!!श्रीकृष्णार्पणमस्तु!!