मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होत आहे रे # 12 ☆ मी कवी हुनार ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है. श्रीमती उर्मिला जी के “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है उनकी एक भावप्रवण कविता मी कवी हुनार है। श्रीमती उर्मिला जी को ऐसी सुन्दर कविता के लिए हार्दिक बधाई. )
☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 12 ☆
☆ मी कवी हुनार ☆
(काव्यप्रकार -विडंबन.)
लयी लयी वाटायचं कराव्यात मस्त कविता !
पन् काय करु ,काय करू…?..
ईचार केला किती बी तरी सुचतच न्हाई वो कविता !
स्पर्धा तर सोडाच पन् कविता वाचन्याजोगी तरीहवी !
आन् रोज रोज म्हन्ते …मी हुईन कवी ! मी हुईन कवी!!
पन् घोडंच कुठं पेंड खातंयं ते काई कळंना !
आन् आजपावतूर मला काही कविता कराया जमना !!
नवस केलं सायास केलं केलं देवदेव !
पन् न्हाई आली कुनालाच माजी वं कीव !!
म्हनलं जरा यावं भेटून फिल्मसिटीत ईनोदाच्या ईरांनला !
पन् कसलं काय आन् फाटक्यात पाय ,तितं
टाईमच हाय कुनाला. !!
भेटलं असतं कवी गुलजार !
पन् ते तरी म्हना काय कामाचं!
आपलं लिखान हाय इडंबन अन् हाय कि वो ईनोदाचं !!
लयी डोस्कं खाजिवलं आन् केला मी ईचार !
बसले एकदाची लिव्हायला तर !
शेजापाजारच्या आयाबायांनी केलं की हो बेजार !
मंग म्हनलं हितं बसून आपली कविता न्हाई हुनार !!
तुकोबांनी आख्खी गाथा लिव्हली भंडाऱ्यावर !
आपनबी जावं की आपल्या डोंगरावर !
तडक उठले अन् तरातरा गेले अजिंक्यताऱा किल्ल्यावर ! !
घेतला भारी पेन आन् लिव्हायला लागले कागदावर. !
आली थंड झुळूक आन् कवा लागला डोळा न्हाई मला कळ्ळं !
डरकाळी बिबट्याची ऐकून काळीजच माजं किवो हाल्लं !
आता कुटं पळू न् काय करु समजना मला !
पट्कन् उटूनशनी पळावं तर पायच लागलं कापायला !!
बिबट्या बिबट्या म्हनून जीव खाऊन वराडले !
आले आले म्हनून सुनबाईनं आवाज दिला !!
म्हनलं बरं झालं ती तरी आली माज्या मदतीला !!!
हात दिला तिच्या हातात न् लागले मी पळायला !
तर चहाची कपबशी घेऊन सुनबाई उभी मला उठवायला !!
©®उर्मिला इंगळे, सतारा
भ्रमण – ९०२८८१५५८५
!!श्रीकृष्णार्पणमस्तु !!