श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है. श्रीमती उर्मिला जी के “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है उनका विनोदपूर्ण गीत धुंधुरमास भोजन (पोवाडा)। इस गीत के सन्दर्भ में उल्लेखनीय है कि आप ‘ लोकमान्य हास्य योग संघ, दौलतनगर शाखा आनंदनगर पुणे की सदस्य रही हैं। उनके वर्ग की सदस्याओं द्वारा धुंधुरमास भोजन का आयोजन किया गया। उस वक्त सुरुचिपूर्ण भोजन के बारे में आपके मन में जो विचार आये उन्हें आपने बड़े ही सुरुचिपूर्ण काव्य में शब्दबद्ध किया है।)
☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 16 ☆
☆ धुंधुरमास भोजन (पोवाडा) ☆
आला आला हो धुंधुरमास !
भोजनाचा बेत केला खास !!
आमसुली घेवडा- पापडी !
शेंगा मटाराच्या सोलुनी !
चुका भाजी बोरं घालुनी !
घातली वांगी-गाजरं चिरुनी !
हरभऱ्याचे सोलाणे सोलुनी!
दिली कढीपत्त्याची फोडणी !
लेकुरवाळी भाजी करुनी !
आणली यादवांच्या ताईंनी !
चटण्या लोणची आणली कुणीकुणी !!
शुभांगीची गाजर कोशिंबीर !
त्यावर हिरवीगार कोथिंबीर !
अशा भाज्या सजल्या सुंदर !
जिलेबीने आणली मस्त बहार !!
मूगडाळ- तांदूळ खिचडी !
दालचिनी मसाला घालुनी !
बनविली पराडकर ताईंनी !!
खिचडीच्या जोडीला कढी !
शीतलनं केली हवी तेवढी !!
काळ्या पांढऱ्या तिळांनी !
जणू नक्षी सुबक काढुनी !
खमंग बाजरीच्या भाकरी !
उर्मिला वाढी लोणी त्यावरी !!
धुंधुरमासाच्या भोजनाचा !
बेत असा छान रंगला !!
बेत असा छान रंगला !
छान रंगला..ऽऽ..हो..ऽऽऽ..
जी…जी…जी……..
©®उर्मिला इंगळे
सातारा.
दिनांक:-२८-११-१९
!!श्रीकृष्णार्पणमस्तु!!