मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होत आहे रे # 18 ☆ वंशाचा दिवा ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है. श्रीमती उर्मिला जी के    “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ”  की अगली कड़ी में आज प्रस्तुत है  उनकी  एक विचारणीय काव्य अभिव्यक्ति  वंशाचा दिवा । इस कविता के सन्दर्भ में उल्लेखनीय  एवं विचारणीय है कि – वंश का  दीप कौन?  पुत्र या पुत्री ? आप  स्वयं निर्णय करें ।  इस अतिसुन्दर रचना के लिए श्रीमती उर्मिला जी की लेखनी को नमन।)  

☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 18 ☆

 

☆ वंशाचा दिवा ☆

(काव्यप्रकार:- मुक्तछंद)

 

वंशाचा दिवा लावा वंशाचा दिवा !

अहो प्रत्येक घरात लागायलाच हवा !

सुनेला मुलगा व्हायलाच हवा !

अशी होती समाजात हवा !!

 

आज काळ बदलला मते बदलली!

मुलगी झाली घरे आनंदली !

सासरच्यांची मते बदलली !

मुलगी झाली घरी लक्ष्मी आली !!

 

मुलगा तर हवाच हवा !

त्याशिवाय कां येणार जावई नवा!

मुलगी तर हवीच हवी !

कारण सूनही घरी यायला हवी !!

 

मुलामुलीत नको भेद !

जुन्या अपेक्षांना देऊया छेद !

संत म्हणती अमंगळ  भेदाभेद !

ऐकूनी त्यांचे बोल मिळतो आनंद !!

 

जुनी परंपरा जपावी खरी !

आजच्या काळाची गरजही न्यारी !

मुलगा काय अन् मुलगी काय!

अहो जुन्याला म्हणूया बाय बाय !!

 

मुलगा घेतो आईबाबांची काळजी!

मुलगी तर घेते सर्वांचीच काळजी !

मुलगा काय किंवा मुलगी काय बुवा !

दोन्हीही असतात वंशाचा दिवा !!

 

©®उर्मिला इंगळे

सतारा, महाराष्ट्र

दिनांक:-25 -1-2020

9028815585