मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होत आहे रे # 19 ☆ लग्नाचा घाणा ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है।  श्रीमती उर्मिला जी के    “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है उनके द्वारा रचित एक लग्न गीत “लग्नाचा घाणा”। आज भी पिछली  पीढ़ियों ने विवाह संस्कार तथा अन्य सामाजिक कार्यक्रमों में गीतों के माध्यम से विरासत में मिले संस्कारों को जीवित रखा है। हम श्रीमती उर्मिला जी द्वारा रचित इस लग्न गीत  के लिए उनके आभारी हैं। निश्चित ही यह गीत  आवश्यक्तानुसार परिवर्तित कर भविष्य में विवाह संस्कारों में गाये जायेंगे।

यह एक संयोग ही है  कि – आज दिनांक 1-2-2020 को उनके पौत्र चिरंजीव अवधूत जी का विवाह है । इसके लिए  ई- अभिव्यक्ति की ऒर से  उनके भावी  दाम्पत्य जीवन की हार्दिक शुभकामनाएं।  इस सुन्दर लग्न गीत की रचना  के  समय उनके मन में  आई भावनाएं उनके ही शब्दों में  – “लग्नाची मुहूर्तमेढ, देवांना बोढण म्हणजे पुरणपोळी पक्वांनाचा नेवैद्य व सवाष्णींना भोजन असा विधी पार पडला त्यावेळी मला सुचलेला लग्नाचा घाणा “. इस अतिसुन्दर रचना के लिए श्रीमती उर्मिला जी की लेखनी को नमन।)  

☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 19 ☆

☆ लग्नाचा घाणा ☆

पाच कुलदेवतांचं देवक वाजत आणलं घरात !

पाच पत्रींची मुहूर्तमेढ रोविली दारात !!१!!

 

पाच सवाष्णींच्या हाताने जात ते पुजिलं!

हळद कुंकू लावुनिया उखळ-मुसळ पुजिलं!!२!!

 

घाणा तो भरण्या सुंदर ते जातं !

सवाष्णींचा हात लागता गरगरा ते फिरतं !!३!!

 

गरगरा फिरतं ते हळकुंड दळितं!

हळकुंड दळित त्याचीहळद करतं !!४!!

 

अवधूत-प्राजूच्या लग्नाची  दळताती हळद!

दळताती हळद बाई ओव्यांच्या सुरात !!५!!

 

ओव्यांच्या सुरात बाई नाद घुमतो घरात!

नाद घुमतो घरात बाई आनंद होतो मनात !!६!!

 

पुरण-पोळीच्या पक्वांनाचं भरिल बोढण !

देवांना नेवैद्य अन् सवाष्णींना भोजन !!७!!

 

हळद-कुंकू लावुनि द्या पानसुपारी हातात!

खण नारळ तांदुळ घाला त्यांच्या ओटीत !!८!!

 

जाई जुईचा गजरा माळा त्यांच्या वेणीत !

गजऱ्याचा वास घुमे सगळ्या घरात  !!९!!

 

उर्मिला हात जोडोनी विनंती करीत !

आनंद सुखसमृद्धी सदा नांदो माझ्या घरात!!१०!!

 

©®उर्मिला इंगळे

दिनांक:- १-२-२०२०

 

!! श्रीकृष्णार्पणमस्तु !!