श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। श्रीमती उर्मिला जी के “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होतं आहे रे ” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है उनकी काव्य विधा चारोळी में रचित एक कविता “स्वातंत्र्य ”। उनकी मनोभावनाएं आने वाली पीढ़ियों के लिए अनुकरणीय है। ऐसे सामाजिक / धार्मिक /पारिवारिक साहित्य की रचना करने वाली श्रीमती उर्मिला जी की लेखनी को सादर नमन। )
☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 26 ☆
☆ स्वातंत्र्य ☆
(काव्य प्रकार:-चारोळी)
स्वातंत्र्य म्हणजे काय
स्वच्छंदीपणे आयुष्य
जगण्याचा अनुभव
अपेक्षितसे मनुष्य !!१!!
स्वातंत्र्य म्हणजे काय
हवं तेव्हा हव्याजागी
हिंडण्याची अनुमती
नको ती परवानगी!!२!!
स्वतंत्र्य म्हणजे स्वैर
नव्हे वागणं बोलणं
त्याने होतं सारं सैल
आणि नको ते घडणं !!३!!
स्वातंत्र्य ही संकल्पना
हक्क जाणीवेची जोड
हेच मनात रुजलं
स्वातंत्र्याला नाही तोड !!४!!
स्वातंत्र्यपूर्व काळात
सत्ता होती परकीय
जनतेची परवड
सारे पाहती स्वकीय!!५!!
मिळविण्यास स्वातंत्र्य
गेले फासावर नर
वेगे शत्रूसी झुंजत
झाले शहीद हो वीर !!६!!
काळ्या पाण्याची हो शिक्षा
भोगली नरवीरांनी
मिळविण्यास स्वातंत्र्य
झटले एकवटुनी !!७!!
त्यांचे करूया स्मरण
ज्यांनी देश घडविला
चरणी नमूया सारे
त्यांच्या अमर स्मृतीला !!८!!
©®उर्मिला इंगळे
सतारा
9028815585
!!श्रीकृष्णार्पणमस्तु!!