मानवीय एवं राष्ट्रीय हित में रचित रचना
श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। श्रीमती उर्मिला जी के “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होतं आहे रे ” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है कोरोना विषाणु पर एक समसामयिक रचना “कोरोनाची ऐशी तैशी”। उनकी मनोभावनाएं आने वाली पीढ़ियों के लिए अनुकरणीय है। ऐसे सामाजिक / धार्मिक /पारिवारिक साहित्य की रचना करने वाली श्रीमती उर्मिला जी की लेखनी को सादर नमन। )
☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 30 ☆
☆ कोरोनाची ऐशी तैशी ☆
(काव्यप्रकार:-अभंग रचना)
कोरोनाच्या मुळे !
जग थांबलया !
विश्रांती घेतया !
शांतपणे !!१!!
अनेक वर्षांची !
रेल्वेची ती सेवा !
घेतीये विसावा !
मनसोक्त !!२!!
वाहणारे रस्ते !
घेतात आराम !
कधीच विश्राम !
नसे त्यांना !!३!!
जाहलिये थंड !
वाहनांची गर्दी !
पोलीसांची वर्दी !
जागोजागी !!४!!
हात ते हातात !
घेत नाही आम्ही!
म्हणतो हो आम्ही !
रामराम !!५!!
हात धुण्यासाठी !
सॅनिटायझर !
हो वापरणार !
घरोघरी !!६!!
कोरोना रोखण्या !
डॉक्टर धावती !
सिस्टर पळती !
मदतीला !!७!!
घरात बसुनी !
पाळुया नियम !
शासना मदत !
करुयाहो !!८!!
घरात राहूनी !
खेळ आम्ही खेळू !
साखर ती दळू !
जात्यावर !!९!!
सागर गोट्यांच्या !
खेळात हातांना !
व्यायाम डोळ्यांना !
छान होई !!१०!!
सागर किनारी !
स्वच्छंदपणाने !
आनंदे हरिणे !
बागडती !!११!!
पिसारा फुलवी !
मोर तो सुंदर !
नाचे रस्त्यावर !
बिनधास्त !!१२!!
उर्मिला म्हणते !
नियम ते पाळा !
आरोग्य सांभाळा !
आपुलाले !!१३!!
©️®️ उर्मिला इंगळे, सातारा
दिनांक:-११-४-२०
!! श्रीकृष्णार्पणमस्तु !!