सूचनाएँ/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆  समाजभूषण बाबूराव गोखले ग्रंथालयाच्या वतीने ☆

☆ कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषयाच्या शिक्षकांसाठी राज्यस्तरीय लॉकडाउन कथा स्पर्धा 2020 ☆

? चला उचला पेन लिहा सुंदर कथा ?

महाराष्ट्र राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विषयाच्या माझ्या सर्व शिक्षक मित्र-मैत्रिणी व बंधु-भगिनींनो आपल्या देशावर ‘कोरोना’ चे प्रचंड मोठे संकट आले आहे. अशावेळी मा.पंतप्रधान, मा.मुख्यमंत्री, मा.शिक्षणमंत्री,  मा.आरोग्यमंत्री यांनी आपल्या सर्वांना स्वतःची काळजी घेण्यासाठी घरातून बाहेर न पडण्याची कळकळीची विनंती केली आहे. आपण त्या आवाहानाचे पालन करण्यासाठी, देशहितासाठी हातभार लावू या.

साधारण एक महिन्याचा हा कालखंड आपल्या सर्वांची परीक्षा बघणारा असला तरी वाचन,लेखन करणारांना ही संधी आहे. आपला हा वेळ सत्कारणी लागावा तसेच आपला लेखनाचा छंद जोपासता यावा यासाठी आमच्या ग्रंथालयाच्यावतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे.

सहभागासाठी हे लक्षात घ्या…..

  • या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही.
  • स्पर्धा फक्त कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आहे.
  • कथा मराठी भाषेत असावी. पूर्वप्रकाशित असू नये.
  • कथा शब्दमर्यादा १५०० इतकी असावी.
  • कथा स्वतःची आहे याचे स्वतःच्या सहीचे प्रमाणपत्र जोडावे.
  • सोबत आपण कार्यरत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे ओळखपत्र झेरॉक्स जोडावी.
  • आपले सध्याचे दोन आयडेंटिटी फोटो पाठवावे.
  • कथा कोणत्याही विषयावर असावी परंतु बीभत्स, अश्लील लेखन नसावे.
  • कथा कागदाच्या एकाच बाजूला स्वच्छ सुंदर अक्षरात लिहिलेली अथवा टाईप केलेली असावी. ईमेल पाठवू नये.पोस्टाने पाठवावी.
  • परिक्षकांनी नाकारलेल्या कथा संदर्भात कोणीही संपर्क साधू नये.
  • निवड झालेल्या कथा लेखकांना फोन अथवा पत्राद्वारे कळविले जाईल.
  • आपली कथा खालील पत्त्यावर दि.२५ एप्रिल ते १० मे २०२० पर्यंत पाठवावी. त्यानंतर आलेल्या कथांचा विचार केला जाणार नाही.
  • पहिल्या पाच कथांना ग्रंथ, सुंदर स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येईल.
  • कथा पाठवताना त्याची मूळ प्रत पाठवून झेरॉक्स आपल्याकडे ठेवावी.
  • कथा स्वतःच्या जबाबदारीवर पाठवावी गहाळ झाल्यास आम्ही जबाबदार नाही.
  • कथा पोहचली की नाही यासाठी खालील फोनवर फोन करावा.
  • परीक्षकांचा निर्णय अंतिम राहिल.सगळ्याच कथा चांगल्या असतात. वादविवाद टाळा.
  • पहिले बक्षीस-स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रु.२०००/
  • दुसरे बक्षीस- स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रु १५००/
  • सरे बक्षीस- स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रु.१०००/
  • चौथे व पाचवे बक्षीस – स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रु.५००/प्रत्येकी.
  • इतर निवडक पंचवीस कथांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
  • भविष्यात निवडक तीस कथांचा कथासंग्रह प्रकाशित करण्याचा मनोदय आहे.
  • बक्षीस समारंभास येण्यासाठी अथवा जाण्यासाठी कोणताही खर्च दिला जाणार नाही.

 

आपला नम्र

प्रा.दादाराम साळुंखे

अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय संघटना, शाखा सातारा.

कथा या पत्त्यावर पाठवावी.

समाजभूषण बाबूराव गोखले सार्वजनिक ग्रंथालय विद्यानगर सैदापूर ता.कराड जि.सातारा. पिन-४१५१२४

फोन नंबर –  9423816782, 9405848764

? चला उचला पेन लिहा सुंदर कथा ?

साभार – योगिता पाखले ( पुणे)

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments