सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

(कविराज विजय यशवंत सातपुते)

☆ कविराज विजय यशवंत सातपुते – ऑनलाईन प्राप्त केलेले 1857 सन्मान – ऐतिहासिकआकडा ☆ अभिनंदन

ऑनलाईन प्रमाणपत्र पदतालिका

कालावधी  5/5/2018  ते  11/12/2020

एकूण  =  1857

ऑनलाईन प्राप्त केलेले 1857 सन्मान त्यांचा ऐतिहासिकआकडा, मनाला आनंद देऊन गेला. आजवरचा प्रवास समाधान कारक ठरला.

सर्वोत्कृष्ट क्रमांक

प्रमाणपत्र (उत्कृष्ट  क्रमांक)                :-  95

प्रमाणपत्र (प्रथम  क्रमांक)                   :-  121

प्रमाणपत्र (द्वितीय क्रमांक)                  :-   111

प्रमाणपत्र (ततीय क्रमांक)                   :-   221

प्रमाणपत्र (उत्तेजनार्थ क्रमांक)             :-   314

प्रमाणपत्र (लक्षवेधीक्रमांक*)               :-   312

प्रमाणपत्र (सहभाग)                            :-   73

प्रमाणपत्र (सर्वोत्तम परिक्षक)               :-   514

प्रमाणपत्र                                             :-   96

                                                          1857

वाॅटस्अप वरील विविध समुहातील,  कार्यप्रवण, स्नेहशील, सर्व संयोजकांचे, आयोजकांचे,परिक्षकांचे,  ग्राफिक्स तंत्रज्ञांचे  मनापासून आभार. आपल्या परिश्रम पूर्वक राबवलेल्या  उपक्रमामुळे आमचा हात लिहिता राहतो  आहे.  काव्य कलेचा व्यासंग वाढतो आहे. ही बाब मला  अतिशय गौरवास्पद  आणि अभिमानास्पद वाटते. स्पर्धा घेताना त्यातही नाविन्य शोधण्याचा  आपला प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे. विषयनिष्ठ  उपक्रमात त्या विषयाचे सर्वांगीण  आकलन होते. मान्यवरांचे मार्गदर्शन लाभते. प्रोत्साहन मिळते , ही बाब  अभिनंदनीय आहे. सर्वांना पुनश्च धन्यवाद. काही ठिकाणी,  समुह प्रशासक, परिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. प्रशासक म्हणून काव्यस्पंदन समुहात जबाबदारी स्वीकारली.

वीस मे दोन हजार वीस पासुन शब्दसेतू वाॅटस अप समुहातून साहित्य सेवा सुरू केली आहे. दोनशे छपन्न सदस्य  सातत्याने या समुहात आपले योगदान देत आहेत. वाचक आणि लेखकांचा हा परीवार आहे. या परीवारात महास्पर्धा, झटपट चारोळी स्पर्धा, दैनंदिन लेखन योगदान, साप्ताहिक उपक्रम, रविवारीय साहित्य स्पर्धा, गणेशोत्सव महास्पर्धा, विशेष स्पर्धा असे स्पर्धात्मक आणि व्यासंग वाढविणारे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. शब्दसेतू साहित्य साधक, शब्दसेतू साहित्य सम्राट, सम्राज्ञी, शब्दसेतू साहित्य प्रणेता, प्रणेती, असे पुरस्कार  सातत्याने दिले गेलें आहेत. याशिवाय दैनंदिन लेखन योगदान करणा-या साधकांना रौप्य महोत्सवी, सुवर्ण महोत्सवी, हीरक महोत्सवी, शतक महोत्सवी विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. कविता, लेख, कथा आदी साहित्याचा व्यासंग शब्दसेतू परीवार जोपासत आहे.

5/5 2018 ते 7/12/2020 या   तीस  महिन्यांत मिळालेले  यश माझ्या साठी  अनमोल  आहे.  या ही अगोदर अनेक जिल्हास्तरीय, राज्य स्तरीय, शासकीय, निमशासकीय सन्मान मिळाले आहेत.नियत कालिकातून लेखन चालू आहे . वाॅटस्अप माध्यमातून ऑनलाईन स्पर्धेतून मिळालेले यश, प्रसिद्धी,अवर्णनीय आहे. अविस्मरणीय आहे. पुनश्च एकदा सर्वांचे  मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. ??✒

स्वल्प परिचय.

  • कवी, लेखक, निवेदक, संपादक, वृत्तपत्र स्तंभलेखक, प्रवासी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक  म्हणून कार्यरत.
  • अक्षरलेणीकार,  प्रस्तावनाकार,  सन्मानपत्र लेखक म्हणून विशेष प्रसिद्धी.
  • अक्षरलेणी कविता संग्रहास साहित्य संस्कृती मंडळाचे  अनुदान प्राप्त.
  • द्वितीय  आवृत्तीस राज्यस्तरीय महाकवी कालिदास पुरस्कार प्राप्त.
  • 1992 मध्ये राज्य स्तरावरील काव्य स्पर्धेत ‘मोरपीस’
  • या कवितेला प्रथम पारितोषिक व कै. वसंत बापट यांच्या हस्ते ‘कविराज’ ही पदवी बहाल.
  • 1988 पासून  सातत्याने काव्य लेखन. सादरीकरण आणि काव्य परीक्षण
  • दैनिक सकाळ कडून ‘खरा पुणेकर ‘ किताब बहाल. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, देऊन शनिवार वाड्यावर जाहीर सत्कार.
  • पुण्याच्या वैभवात भर घालणारी व्यक्ती, व सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी व्यक्ती म्हणून महापौर पुणे यांच्या हस्ते 2014, 2015, 2016, सलग तीन वर्षे सन्मान चिन्ह देऊन जाहीर सत्कार.
  • अनेक कविता संग्रह, कथा संग्रह यांत प्रस्तावना लेखन.
  • झरा खळाळे जीवंत, काव्यशिल्प ,  यासह अनेक प्रातिनिधीक कवितासंग्रहाचे संपादन.
  • अनेक राज्यस्तरीय कविता स्पर्धांचे, कविसंमेलनाचे, आयोजन, नियोजन,  परिक्षण केले आहे.
  • शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर वैयक्तिक व सामुहिक. कवितांचे सादरीकरण.
  • दैनिक म. टा. ,लोकमत, सकाळ, प्रभात कडून विविध पुरस्कारांनी सन्मानित. अनेक दैनिकातून प्रासंगिक लेखन आणि स्तंभ लेखन केले आहे…!
  • अनेक राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय आणि राष्ट्रीय  पुरस्कारांनी सन्मानित.
  • विविध पारितोषिके प्राप्त.
  • अनेक  संस्थामधे विविध पदांवर कार्यरत.
  • कवितेविषयक,साहित्यविषयक, प्रत्येक उपक्रमात सहभागी. विविध मासिके, नियत कालिके दिवाळी अंकातून  लेख,कथा, कविता, गझल, लेखन प्रकाशित.
  • अखिल भारतीय साहित्य संमेलनात दरवर्षी सहभाग.
  • कलर टिव्ही वरील ‘काॅमेडीची बुलेट ट्रेन ‘या कार्यक्रमात प्रेक्षक परिक्षक म्हणून सहभाग.
  • दूरदर्शन वरील  अनेक चॅनेल वरून, आकाशवाणी वरून  काव्य सादरीकरण, काव्य वाचन झाले आहे.
  • वाचन, लेखन, प्रवास, हे विशेष छंद.
  • अनेक कथा संग्रह, कादंबरी,  चारोळी संग्रह, कविता संग्रहाला प्रस्तावना दिल्या आहेत.
  • साडेतीनशेहून अधिक मानपत्रांचे लेखन केले आहे.
  • केली दहा वर्षे सातत्याने  अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवीकट्टा कवीसंमेलनात निवड झाली आहे.
  • अनेक ठिकाणी कविता सादरीकरणाचे वैयक्तिक, सांघिक,  कार्यक्रम सादर केले आहेत.
  • अनेक साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे यशस्वी  आयोजन सातत्याने गेली तीस वर्षे करीत आहे.  महाराष्टातील बावीस संस्थामधे विविध पदांवर कार्यरत आहे.
  • प्रकाश पर्व हा तिसरा कविता संग्रह प्रकाशित. प्रकाशक :-सूर्यगंध प्रकाशन,  तळेगाव.
  • अनेक प्रातिनिधिक कविता  संग्रहात कविता सहभाग.
  • महाराष्ट्र भूषण  अष्टपैलू कार्यगौरव पुरस्कार 2019 प्राप्त. हस्ते डाॅ. श्रीपाल सबनीस.
  • दिनांक.  2/2/2020 रोजी समर्थ प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र  आयकॉन  या राज्य स्तरीय पुरस्काराने पुरस्कृत.
  • पुण्यातील अनेक साहित्यिक, सामाजिक संस्था मध्ये विविध पदांवर कार्य रत.. अनेक कार्यक्रमांचे आयोजन, संयोजन आणि निवेदन करत आहे.
  • शब्दसेतू साहित्य मंच पुणेया वाॅटस अप समुहाचा  संस्थापक  अध्यक्ष.*
  • कोविड योद्धा  म्हणून समाजात सध्या कार्यरत आहे.
  • पोएट ऑफ दि इयर 2020 हा सन्मान प्राप्त. साहित्य गौरव संमेलनात  18/10/2020 रोजी ऑनलाईन प्रदान करण्यात आला
  • कादवा शिवार  प्रतिष्ठान नाशिक , गझल लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त.
  • साहित्य सेवा संघ भोर राज्य स्तरीय काव्य लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त.
  • माझी लेखणी  या समूहात सप्टेंबर  महिन्यात महाउपक्रम सोहळा संपन्न झाला. संपूर्ण एक आठवडाभर रोज नवनवीन विषयावर सुरेख काव्य रचना करून, महाउपक्रम सोहळ्यात सर्वोत्कृष्ट क्रमांक प्राप्त .???
  • ऑनलाइन दैनंदिन लेखन कला व्यासंगातून, अनेक विध वाॅटस अप समुहात  अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
  •  वाॅटस अप समुहात अनेक स्पर्धांमध्ये,परीक्षक म्हणून कार्यरत…!

व्यवसाय – अकौंट लेखन. . सध्या खाजगी शाॅप मध्ये अकौंटंट म्हणून कार्यरत

वीस वर्षे डिफेन्स अकौट क्लाॅथ शाॅप मध्ये सर्व्हिस..अकौंटंट ते मॅनेजर म्हणून कार्यरत ( 1993 ते 2013 पर्यत..

कविराज विजय यशवंत सातपुते

यशश्री 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर 2. दशभुजा गणपती रोड, पुणे  411 009 .

मोबाईल नंबर  9371319798 .

[email protected].

? ई-अभिव्यक्तीच्या संपादक मंडळाकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन ? 

आभार     

सम्पादक मंडळ (मराठी) 

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 94212254910

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
मनोहर वाळिंबे

पुरस्कारांची संख्या ‘दिन दुनि रात चौगुणी’ अशीच वाढत जावो …हीच सदिच्छा…..आपले साहित्यिक कार्य आमच्यासाठी मार्गदर्शक आहे दादा….???