सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
💐 गणेश चतुर्थी उत्सव एर्लांगेन (Erlangen) – मराठी मित्र मंडळ फ्रँकेन, जर्मनी 💐
मराठी मित्र मंडळ फ्रँकेन, जर्मनी या मराठमोळया मंडळातर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेश चतुर्थी उत्सव एर्लांगेन (Erlangen) येथे ११ सप्टेंबर २०२२ रोजी मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्रींचे पारंपारिक आगमन, पूजा व आरती, महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम आणि श्रींचे विसर्जन असा सर्वसमावेशक कार्यक्रम येथील मराठी आणि भारतीय बांथवांसाठी एक विशेष आकर्षण ठरला.
ई-अभिव्यक्ति (हिन्दी/मराठी/अङ्ग्रेज़ी) या प्रसिद्ध प्रकाशनाचे संपादक माननीय श्री हेमंत बावनकर यांनी मंडळाच्या आयोजिका सौ. माधुरी नाडकर्णी यांचीशी संपर्क करून अगत्याने या कार्यक्रमात सहपरिवार सहभाग घेतला. यावेळी त्यांनी मंडळाला श्री अमोल केळकर लिखित ‘माझी टवाळखोरी’ व डॉ हंसा दीप लिखित व सौ उज्ज्वला केळकर अनुवादित ‘…आणि शेवटी तात्पर्य’ या दोन मराठी संग्रहांची सस्नेह भेट दिली.
मराठी मित्र मंडळ फ्रँकेन, जर्मनी तर्फे श्री हेमंत बावनकर, सौ उज्ज्वला केळकर आणि श्री अमोल केळकर यांचे मनःपूर्वक आभार आणि सस्नेह प्रणाम.
मराठी मित्र मंडळ फ्रँकेन, जर्मनी
११ सप्टेंबर २०२२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈