सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
डॉ. शैलजा करोडे – अभिनंदन
संपादकीय निवेदन
आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री डॉ. शैलजा करोडे यांना नुकताच ‘World Constitution and Parliament Association‘ या संस्थेतर्फे देण्यात येणारा “World Parliament International Award“ हा जागतिक प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार दिला जातो …. ” For Significant Contribution to Global Human Society “.
डॉ. शैलजा करोडे यांना सामाजिक क्षेत्रातील आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल अनेकदा राज्य शासनातर्फे पुरस्कार दिले गेले आहेत. आणि त्यांचे या क्षेत्रातले आत्तापर्यंतचे भरीव कार्य आणि त्यांना मिळालेले असे अनेक पुरस्कार लक्षात घेऊन त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे ही खूपच गौरवास्पद गोष्ट आहे.
आपल्या सर्वांतर्फे डॉ. शैलजाताईंचे अतिशय मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!!!
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈