सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
श्री दीपक तांबोळी – अभिनंदन
संपादकीय निवेदन
आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखक श्री. दीपक तांबोळी यांच्या “वाटणी” या कथासंग्रहाला १० वा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
दत्तात्रेय सांडू प्रतिष्ठान, चेंबूर, मुंबई यांच्यातर्फे दरवर्षी उत्कृष्ट कथासंग्रह, कादंबरी, कवितासंग्रह इत्यादी साहित्य प्रकारातील पुस्तकांना राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दिले जातात.. या वर्षीचे साहित्य पुरस्कार प्रतिष्ठानचे श्री आनंद सांडू यांनी जाहीर केले असून, उत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कार लेखक श्री. दीपक तांबोळी यांच्या ” वाटणी ” या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे.
“वाटणी ” या कथासंग्रहाला मिळणारा हा १० वा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार असून त्यांच्या एकंदरीत पुस्तकांना मिळणारा ३० वा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आहे हे विशेष गौरवास्पद आहे. आपल्या सर्वांतर्फे श्री. तांबोळी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या यापुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
आजच्या अंकात वाचूया या पुरस्कारप्राप्त कथासंग्रहातील एक कथा ‘तृप्ती’.
– संपादक मंडळ
ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈