सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
संपादकीय निवेदन
☆ सौ. पुष्पा प्रभुदेसाई, सौ अंजली गोखले, सुश्री नीलम माणगावे – अभिनंदन ☆
सौ. पुष्पा प्रभुदेसाई
सौ अंजली गोखले
(१) आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सौ. पुष्पा प्रभुदेसाई यांच्या “ मैत्र जीवाचे “ या पुस्तकाचा, आणि सौ अंजली गोखले यांच्या ” कालातीत दैवी मैत्री “ या अनुवादित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आज दि. १० ऑक्टोबर २०२४ रोजी सांगलीतील जेष्ठ पत्रकार ” श्री चिंतामणी सहस्त्रबुद्धे” यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.
सौ. पुष्पा प्रभुदेसाई
सौ. अंजली गोखले
आपल्या सर्वांतर्फे या दोन्ही लेखिकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!!!!
सुश्री नीलम माणगावे
(२) महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा जयसिंगपूर, आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर, यांच्या संयुक्त विद्यमाने, आपल्या समूहातील ख्यातनाम ज्येष्ठ लेखिका सुश्री नीलम माणगावे यांच्या “बापू, तुम्ही ग्रेटच“ या ‘दीर्घ कवितेच्या‘ पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. त्यांचे हे ७५ वे पुस्तक आहे हे इथे विशेषकरून सांगायलाच हवे.
सुश्री नीलम माणगावे
आपल्या सर्वांतर्फे नीलमताईंचे अगदी मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच जोमदार साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!!!!
– संपादक मंडळ
ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈