सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
💐 संपादकीय निवेदन 💐
वाचकहो, आज या निवेदनाद्वारे पुन्हा एकदा आपली भेट घेत आहोत.
दि.01/10/2021 पासून आम्ही ‘संपादकीय’ हे सदर चालू केले होते.या सदरामध्ये साहित्यिकांच्या जन्मदिनानिमित्त किंवा त्यांचे पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीविषयी जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यायोगे त्यांच्या साहित्याविषयी आम्हाला अधिक माहिती मिळाली व ती आपणापर्यंत पोहोचविणे आम्हाला उचित वाटले.तीस सप्टेंबरला या उपक्रमास एक वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत सर्व साहित्यिकांविषयी आम्ही लिहू शकलो नाही हे आम्हाला माहित आहे. परंतू अनेक साहित्यिकांचे कार्य आपणापर्यंत पोहोचवू शकलो असे आम्हास वाटते. या कामात आम्हाला कराड येथील साहित्य साधना या संस्थेने प्रकाशित केलेल्या शताब्दी दैनंदिनीचा आणि विकिपीडिया अत्यंत मोलाचा उपयोग झाला आहे. त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या जन्ममृत्यूच्या तारखां संदर्भासाठी उपयुक्त ठरल्या आहेत.
आज एक वर्षाच्या पूर्तीनंतर आम्ही हे सदर थांबवण्याचा निर्णय घेत आहोत. या सदरामुळे सर्वांनाच साहित्यिकांचे जीवन व कार्य याविषयी बरीच माहिती मिळाली असेल असे आम्हाला वाटते. नवीन काहीतरी देत राहूच. तोपर्यंत या ‘संपादकीय’ सदरास पूर्णविराम !
आपले
संपादकीय सदस्य
संपादक मंडळ,
ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
संपादकीय निवेदन :