सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सम्पादकीय निवेदन : काही सूचना
1) आपल्या ई अभिव्यक्ती (मराठी) साठी लेखन करणार्या साहित्यिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या साहित्याबरोबरच त्यांची वैयक्तिक व कार्यकर्तृत्वाची ओळख व्हावी म्हणून आपण त्यांचा परिचय व फोटो या अंकात देत असतो. अद्यापही अनेकांचे फोटो व परिचय उपलब्ध झालेले नाहीत.
तरी सर्वांना नम्र विनंती की ज्यांचे फोटो व परिचय आमचेकडे पाठवलेले नाहीत त्यांनी त्यांच्या पुढील लेखनाबरोबर ते पाठवावेत व सर्वांना आपला परिचय करून द्यावा.
2) काही कथा व लेख हे एकापेक्षा जास्त भागांमध्ये प्रकाशित होत असतात.असे लेखन पाठवत असताना काही वेळेला त्याचे भाग पाडताना योग्य ती काळजी घेतली जात नाही,असे दिसते.तरी आवश्यक ती काळजी घ्यावी.उदाहरणार्थ:
– पहिला भाग संपला की क्रमशः असे लिहावे.
– पुढचा भाग लिहीताना ,पहिल्या भागातील अंतीम मजकुराचा उल्लेख करावा. म्हणजे वाचताना क्रम लक्षात येईल. तसेच भाग पाठवताना क्रम पहावा.
दर्जेदार साहित्य सादर करणे हे आपले सर्वांचेच उद्दिष्ट असल्याने आपण आमच्या अडचणी समजून घ्याल अशी खात्री आहे.
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
श्रीमती उज्ज्वला केळकर
Email- [email protected] WhatsApp – 9403310170
श्री सुहास रघुनाथ पंडित
Email – [email protected]) WhatsApp – 94212254910
सौ. मंजुषा मुळे
संपर्कासाठी : Email – [email protected] WhatsApp – 9822846762
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈