सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सम्पादकीय निवेदन
श्री अरविंद लिमये सौ. नीला देवल सौ. मंजुषा मुळे
अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!
- विपुलश्री मासिक दर वर्षी वासंतिक कथास्पर्धेचे आयोजन करते. यदाच्या वर्षी ई – अभिव्यक्तीच्या 2 साहित्यिकांना कथा स्पर्धेत पुरस्कार मिळाला आहे.
श्री अरविंद लिमये आणि सौ. नीला देवल. श्री अरविंद लिमये यांना स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे, तर सौ. नीला देवल यांना उत्तेजनार्थ कथा म्हणून पारितोषिक मिळाले आहे.
- निगडी, पुणे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे रवींद्रनाथ ठाकुर सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या स्वा.सावरकर यांच्या वरील लघुलेखन स्पर्धेत, ई- अभिव्यक्ती (मराठी) च्या सहसंपादिका सौ. मंजुषा मुळे यांना या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.
सर्व साहित्यिकांचे ई – अभिव्यक्तीतर्फे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
श्रीमती उज्ज्वला केळकर
Email- [email protected] WhatsApp – 9403310170
श्री सुहास रघुनाथ पंडित
Email – [email protected]) WhatsApp – 94212254910
सौ. मंजुषा मुळे
संपर्कासाठी : Email – [email protected] WhatsApp – 9822846762
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈