सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सौ.पुष्पा नंदकुमार प्रभूदेसाई – अभिनंदन
माहीम सार्वजनिक वाचनालय, मुंबई यांनी आयोजित केलेल्या पारंपारिक उखाणा ऑनलाईन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री सौ.पुष्पा नंदकुमार प्रभू देसाई यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
त्यांचे ई-अभिव्यक्ती समुहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
पारंपारिक उखाणाही आपल्या वाचनासाठी देत आहोत. हावभावा सहित म्हटलेला पारंपारिक उखाणा –
कांडुन कुटुन केला गोळा.
पंचमीन उघडला डोळा.
गणेशाची निवडते डाळ.
आला दसरा म्हाळ (महालय).
दसरा म्हाळाच्या गाठी.
आली शिलंगण लोटी.
शिलंगणाच घेते सोन.
आली दिवाळी.
दिवाळीला भाऊरायाच येण हुईल.
माहेरी जाणं हुईल.
दिवाळीची करते आरती.
आली संक्रांत नेणती.
संक्रांतीचा पुजते पाट.
आला शिमगा गजरघाट.
शिमग्याचा रंग.
पाडवा चक्कर दंग.
पाडव्याची पुजते गुढी.
आली आकितीची(अक्षय तृतीया) उडी.
आकितीचा पुजते करा.
बेंदरा पत्तुर (पर्यंत) धीर धरा.
दीड महिन्यानी नागर पंचीम येईल.
रावसाहेब—– गाडी घोड घ्युन(घेऊन) आलात तर येण हुईल. नाय तर इथच रहाण हुईल.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈