सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
द्वितीय वर्धापनदिन
💐 धन्यवाद 🙏🏻 आभार 🙏🏻 आणि अभिनंदन! 💐
ई-अभिव्यक्ती (मराठी) हे साहित्यिक दैनिक सुरू करून आज दोन वर्षे होत आहेत. ई-अभिव्यक्ती (मराठी) चा आज दुसरा वर्धापन दिन.
15ऑगस्ट 2020 ला सुरु केलेल्या या साहित्यिक दैनिकाला सुरूवातीपासूनच प्रतिसाद मिळत गेला.दिवसेंदिवस नवे नवे साहित्यिक जोडले गेले.विविध विषयांवरचे लेख, कथा, कविता येऊ लागल्या. साहित्याच्या विविध प्रकारांनी ‘अभिव्यक्ती ‘ नटले.
आपण सर्व साहित्यिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. लेखन, वाचन व त्यावरील प्रतिक्रिया यांमुळे अंकात वैविध्यपूर्णता येत गेली व अंकाचा ताजेपणा टिकून राहिला. आपण सर्वांची साथ मिळाली म्हणूनच हे शक्य झाले. म्हणूनच आपणा सर्वांचे आभार आणि अभिनंदन 🙏🏻
🇮🇳 देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..! 🇮🇳
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/सौ. सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈