🕯 संपादकीय निवेदन 🕯
🕯 ई-अभिव्यक्ती (मराठी) – दिवाळी अंक 🕯
फराळ दिवाळी – अक्षर दिवाळी
सुगंधी उटण्याच्या वातावरणात फराळाचा आस्वाद घेताना तुमचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत साहित्याचा नजराणा! अक्षरांच्या दीपांनी तुमचे मन उजळवून टाकायला!
*प्रतिक्षा संपली आता
अभिव्यक्ती येता हाता*
ई अभिव्यक्तीचा पहिला वहिला ई-दिवाळी अंक शब्दसौंदर्याने नटून थटून येत आहे तुमच्या हाती,अगदी लवकरच.
अगदी कुठेही वाचा—
तुमच्यास्मार्टफोनवर, लॅपटॉप, काॅम्प्युटर, आय फोन, टॅबलेटवर, अगदी कुठेही. कारण हा आहे स्मार्ट वाचकांचा स्मार्ट दिवाळीअंक!
विशेष म्हणजे क्यू.आर.कोड सुद्धा मिळणार आहे स्कॅनिंगसाठी.
आता तयार ठेवा तुमचे मोबाईल आणि लॅपटॉप आणि घ्या आनंद या आगळ्यावेगळ्या अंकाचा.पाठवा आपल्या रसिक वाचक मित्रांना आणि वाढवा आनंद दिवाळीचा.
…..आणि हा अमूल्य खजिना अगदी विनामूल्य बरं का!
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈