सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
श्री सुजित कदम
💐अ भि नं द न 💐
आपल्या ई-अभिव्यक्ति समूहातील सिद्धहस्त तरुण कवी श्री सुजित कदम यांचा “अरे अरे ढगोबा” हा नवा बालकविता संग्रह – नरवीर प्रकाशन, पुणे, यांनी नुकताच अतिशय आकर्षक मांडणी करून प्रकाशित केला आहे.
“अशा मोठ्ठ्या विमानात एकदा तरी बसू
उंच उंच फिरताना आपण ढगांसोबत हसू.”
— अशासारखे बालमनाचे एक लोभस कल्पनाविश्व या संग्रहाला व्यापून राहिले आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
आजी गाई गाणे, झाड हळू हळू डुले.
हिरवी हिरवी पाने म्हणजे,–
झाडोबाची मुले……… अशासारख्या निरागस ओळी मोठ्यांनाही बालपणात घेऊन जातील अशाच..
लहान मुलांसाठी असे साहित्य लिहिणे, हे अतिशय अवघड असते. त्यामुळे, उत्तम बालसाहित्यकार मोजकेच असतात असे म्हटले जाते.. या संग्रहामुळे, या यादीत सुजित कदम या कवीचे नाव महत्त्वाचे ठरावे, असे म्हणूनच समीक्षकांनी म्हटले आहे.
‘सावली देताना झाड कधी
जातपात पाहत नाही-!
कितीही असलं ऊन तरी-
सावली देणं सोडत नाही—!’
यासारख्या ओळी जाताजाता मुलांना कर्तव्यपालन, स्वभावधर्म व एकात्मतेचा मार्गही दाखवून जातात.
म्हणूनच हे पुस्तक मोठ्यांनी आवर्जून विकत घ्यायला हवे. आणि मुलांच्या हाती वाचायला आवर्जून द्यायला हवे, अशी प्रतिक्रिया जाणकारांनी वाचताच व्यक्त केली आहे.
💐 श्री सुजित कदम यांचे त्यांच्या या नव्या पुस्तकाबद्दल आपल्या ई-अभिव्यक्ति समूहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच समृद्ध साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
Very nice