सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री कुंदा कुलकर्णी

💐अ भि नं द न 💐

आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री कुंदा कुलकर्णी यांना मराठी साहित्य मंडळ, ठाणे यांच्यातर्फे, साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय  “सावित्रीबाई फुले साहित्य भूषण” हा मानाचा व अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या “ भगवान वेदव्यास “ या उत्कृष्ट माहितीपूर्ण पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 

“ भगवान वेदव्यास “ यांचे जीवनकार्य या पुस्तकरूपाने लोकांना माहिती करून द्यावेसे का वाटले – याबाबतचे लेखिकेचे मनोगत आपण याआधी वाचलेलेच आहे. आता या पुरस्काराने हे पुस्तक सन्मानार्थ ठरले आहे ही गोष्ट खरोखरच खूप अभिमानास्पद आहे. 

या निमित्ताने लेखिकेने वेदव्यासांविषयी दिलेली थोडी माहिती वाचू या —

व्यासोऽच्छिष्टं जगत्सर्वम्.

“असा एकही विषय नाही की ज्याला महर्षी व्यासांनी स्पर्श केला नाही. ते अत्यंत ज्ञानी होते. मला लहानपणापासून अनेक ग्रंथ ,पोथ्या, पुराणे वाचायला मिळाली. प्रत्येक अध्यायाचे शेवटी “इति श्री वेदव्यासविरचितम्” असे असायचे किंवा सुरुवातीला “व्यास उवाच” असे असायचे. त्यामुळे व्यासांविषयी प्रचंड उत्कंठा होती. मध्यंतरी नैमिषारण्य यात्रा घडली. तिथे व्यास गद्दी आहे. ज्या आसनावर बसून महर्षी व्यासांनी वेद, पुराणे, महाभारत, भागवत कथन केले ते आसन आणि त्यावर बसलेली त्यांची  पूज्य मूर्ती पाहताच आपोआप हात जोडले गेले आणि अक्षरश: डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला. तिथून आल्यानंतर अधाशासारखे त्यांच्याबद्दल मिळेल तिथून माहिती काढली. अनेक हात मदतीला आले. अनेक संदर्भ ग्रंथ मिळाले. आणि “भगवान वेदव्यास “या पुस्तकाचे प्रकाशन 19 मे २०२२ रोजी झाले. खूप मागणी आली. या विषयावर अनेक व्याख्याने पण झाली. आणि 19 मे 23 रोजी मला या पुस्तकाबद्दल पुरस्कार मिळाला ही व्यासांचीच कृपा. वेदव्यासांबद्दल खूप माहिती या पुस्तकात आहे. कुणाला हवे असल्यास मला पर्सनल वर कॉन्टॅक्ट करावा ही विनंती.” — सौ. कुंदा कुलकर्णी

💐ई – अभिव्यक्तितर्फे लेखिका सुश्री कुंदा कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments